चकाकती कार, एका तासाचे 20 लाख, काकीची 'अश्लील' ऑफर, भाचीने दाखल केली FIR

मुंबई तक

ghazipur crime news : सख्ख्या काकीनेच भाचीला अश्लील कृत्यासाठी 20 लाखांचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

ghazipur crime news
ghazipur crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चकाकती कार, एका तासाचे 20 लाख

point

काकीची 'अश्लील' ऑफर, भाचीने दाखल केली FIR

Crime News : एका सख्ख्या काकीनेच पैशांच्या आमिषापोटी स्वतःच्या भाचीच्या सन्मानाचा सौदा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, तिची काकी आणि गावातील एका युवकाने मिळून तिला एका तासाच्या कामाच्या बदल्यात तब्बल 20 लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. सुरुवातीला या प्रस्तावाबाबत संशय आल्याने तरुणीने नेमके कोणते काम करावे लागणार आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकारामागील धक्कादायक बाब समोर आली. संबंधितांनी तिला शेजारच्या आझमगढ जिल्ह्यात नेऊन तेथे एका तासासाठी अश्लील कृत्य करावे लागेल, असे सांगितल्याचा आरोप तिने केला आहे.

हेही वाचा : अंकशास्त्र आणि राजकारण्यांचं भवितव्य, पाहा ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचं पुढे काय होणार?

अश्लील कृत्यासाठी 20 लाखांचे आमिष

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी काकी आणि तिचा साथीदार गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर सातत्याने दबाव टाकत होते. या संपूर्ण व्यवहारासाठी 80 लाख रुपयांचे बजेट ठरल्याचे सांगण्यात आले होते. त्यापैकी 20 लाख रुपये थेट तरुणीला दिले जातील, तर उर्वरित रक्कम काकी आणि तिचा साथीदार आपापसात वाटून घेतील, असे तिला सांगण्यात आले. तसेच या व्यवहाराची माहिती घरातील कोणालाही देऊ नये, अशी सक्त ताकीदही तिला देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावामागील उद्देश समजल्यानंतर तरुणीने तो स्पष्टपणे नाकारला आणि आपल्या आत्मसन्मानाला प्राधान्य देत कोणत्याही परिस्थितीत असे कृत्य करणार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा : '10 कोटींची जमीन तुझी, फक्त आईला मारुन टाक' 24 वर्षीय आयुषीने कसा रचला कट?

हे वाचलं का?