रश्मिका- विजय देवरकोंडा बोहल्यावर चढणार, विवाह सोहळ्याला दिलं 'ते' स्पेशल नाव
Vijay-Rashmika Wedding : साउथ सिनेस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मागील काही वर्षांपासून एकमेकांशी विवाह करणार असल्याच्या चर्चा होता. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल होत होती, पण त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये काही निवडक नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत विवाह करतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विजय- रश्मिकाच्या विवाहाचं ठरलं
दोघांची केमिस्ट्री घ्या जाणून
Vijay-Rashmika Wedding : साउथ सिनेस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या लग्नाबाबत काही महिन्यांपासून चर्चा सुरु होती. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अशातच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये काही निवडक नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत विवाह करतील.
हे ही वाचा : मुलाचं लग्न तोंडावर असताना 37 वर्षीय मामी 21 वर्षीय भाच्यासोबत गेली पळून, नवरा आठवणीत झाला वेडा
विजय- रश्मिकाच्या विवाहाचं नाव ठरलं
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी संयुक्तपणे पत्राद्वारे लग्नाची पुष्टी केली. दोघांनीही त्यांच्या लग्न समारंभाला द वेंडिंग ऑफ 'VIROSH' असे म्हटलं. चाहत्यांनीच दिलेलं हे नाव वर्षानुवर्षे प्रेमाने दिले असे त्यांचं म्हणणे आहे, असं त्या पत्रिकेत नमूद केले.

विजय-रश्मिका यांचा 3 ऑक्टोबर रोजी साखरपु़डा झाला होता. साखरपुड्यात नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तरीही त्यांनी साखरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती अशी माहिती एका वृत्तमाध्यमाने दिली.










