पंढरपूर : सासूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात मिसळलं विष, पण नवऱ्याचाच गेला बळी... कसा फसला महिलेचा डाव?

मुंबई तक

• 02:16 PM • 22 Feb 2026

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला सुनेनं विषाचा प्रयोग केला, पण महिलेने रचलेल्या या कटातून तिची सासू तर वाचली पण ज्या नवऱ्यासोबत आरोपी महिलेने सात फेरे घेतले, त्या पतीचाच या विषप्रयोगामुळे करुण अंत झाल्याची माहिती समोर आली आहे.

सासूसाठी पेरलेल्या विषामुळे पतीचाच गेला जीव

सासूसाठी पेरलेल्या विषामुळे पतीचाच गेला जीव

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सासूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात विष मिसळलं

point

पण, सासूसाठी पेरलेल्या विषामुळे नवऱ्याचाच बळी गेला...

point

पंढरपुरातील धक्कादायक घटना

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातून अनैतिक संबंधाचं एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे वाचून तुमचाही थरकाप उडेल. वृत्तानुसार, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला सुनेनं विषाचा प्रयोग केला, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. महिलेने रचलेल्या या कटातून तिची सासू तर वाचली पण ज्या नवऱ्यासोबत आरोपी महिलेने सात फेरे घेतले, त्या पतीचाच या विषप्रयोगामुळे करुण अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

सासूच्या हत्येचं प्लॅनिंग... 

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचे तिच्या गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, महिलेची सासू तिच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती. कारण, सासुला आपल्या सुनेच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागली आणि या कारणावरून घरात दररोज वाद सुरू झाले. अनैतिक संबंधातील हा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने एक भयानक कट रचला. तिने आपल्या सासूला विष देऊन मारून टाकण्याची योजना आखली. 

हे ही वाचा: 'हसू झालंय माझं..,जीव होता तो माझा..', सोलापुरातल्या पायलची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट; तिघांना अटक

सासूसाठी पेरलेल्या विषामुळे पतीचाच गेला जीव 

ठरल्याप्रमाणे, आपल्या प्रियकराने दिलेली विषाची बाटली त्या महिलेने सासूच्या पिण्याच्या पाण्याच्या कळशीत रिकामी केली. रात्री सासूने ते पाणी पिण्यासाठी घेतलं, पण ते तोंडात टाकताच तिला पाण्याची चव कडू लागली आणि तिने तो तांब्या बाजूला ठेवला. मात्र, त्याच वेळी आरोपी महिलेचा पती समाधान जेवण करत होता आणि दुर्दैवाने त्याने तिथे असलेलं विषारी पाणी प्यायलं. ते पाणी प्यायल्यानंतर, काही वेळातच समाधानची प्रकृती खालावली आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेने सासूसाठी पेरलेल्या विषाने स्वत:च्याच कुंकवाचा बळी घेतला. 

हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय भारत सरकारच्या कंपनीत नोकरी... 'या' उमेदवारांसाठी तर सुवर्णसंधी

याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपी सुनेला बेड्या ठोकल्या. दरम्यान, या प्रकरणात महिलेच्या प्रियकराचा नेमका सहभाग किती? आणि हा कट कसा आखला गेला? याचा पोलीस तपास करत आहेत. संबंधित घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.