Abroad Tour: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी फायदेशीर ठरू शकते. भारतीय पर्यटक 56 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 ने पुष्टी केल्याप्रमाणे भारतीय पासपोर्ट आणखी पावरफूल झाला असून भारत निर्देशांकात आता 75 व्या स्थानावर पोहोचला आहे. याचाच अर्थ असा की भारतीयांना आता काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी लांब व्हिसा प्रक्रियेतून जावं लागणार नाही.
ADVERTISEMENT
भारतीयांना 'या' 56 देशांमध्ये प्रवास करणं सोपं...
भारतीय पासपोर्टच्या सुधारित रँकिंगमुळे, भारतातील नागरिक कोणत्याही अडचणीशिवाय 'या' 56 देशांमध्ये प्रवास करू शकतील. या देशांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही व्हिसाची गरज लागणार नसून तिथे पोहोल्यानंतर व्हिसा-ऑन-अरायव्हल किंवा ई-व्हिसा सुविधा उपलब्ध असतील. अनेक देशांमध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असेल. आश्चर्याची बाब म्हणजे, भारतीयांना कॅरिबियन बेटे, आफ्रिका आणि आशियाई देशांसह या 56 देशांमध्ये प्रवास करणे सोपं होईल.
भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येणारे 56 देश
1. व्हिसा-मुक्त प्रवेश उपलब्ध
- आशिया: भूतान, कझाकिस्तान, मकाओ (एसएआर चीन), मलेशिया, नेपाळ.
- आफ्रिका: अंगोला, मॉरिशस, रवांडा, सेनेगल
- कॅरिबियन: बार्बाडोस, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, जमैका, मोंटसेराट, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो
- ओशनिया: कुक बेटे, फिजी, किरिबाटी, मायक्रोनेशिया, नियू, वानुआटु
- मध्य पूर्व: कतार
2. इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता (ETA)
या देशांसाठी पूर्व-मंजुरी व्हिसा सहसा ऑनलाइन उपलब्ध असतात, ही प्रक्रिया काही तासांत पूर्ण होते. यामुळे भारतीयांना केनिया, सेशेल्स आणि सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांमध्ये प्रवेश मिळतो.
हे ही वाचा: अपघाताच्या आदल्या रात्री दादांना फोन केला होता का? प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच बोलले, कॉल करण्याचं कारणही सांगितलं
3. व्हिसा ऑन अरायव्हल
हे देश भारतीय पर्यटकांना विमानतळावर किंवा सीमेवर व्हिसा देतात, ज्यामुळे प्रवास सोपा होतो.
ADVERTISEMENT











