महिलेला बघून तरुणामध्ये जागा झाला सैतान, चाकूचा धाक दाखवून शरीरसुखाची केली मागणी, एवढ्यावरच न थांबता...

योगेश पांडे

• 02:38 PM • 23 Feb 2026

Nagpur crime : नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका कुख्यात गुन्हेगाराने एका महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक धाकवला. नंतर त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने पीडितेकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Nagpur crime

Nagpur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीनं महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी 

point

नंतर चाकूने मारण्याची दिली धमकी

Nagpur Crime : नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका कुख्यात गुन्हेगाराने एका महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक धाकवला. नंतर त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने पीडितेकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 20 फेब्रुवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती

आरोपीनं महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी 

नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे परिसरातच ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र उर्फ मनोज समुंद्रे (वय 27) ही व्यक्ती 20 फेब्रुवारी रोजी पीडितेकडे शरीरसुखाची मागणी करत होती. महिलेनं विरोध केल्याने आरोपी संतापला. त्याने पीडितेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. 

नंतर चाकूने मारण्याची दिली धमकी

पीडितेनं नकार देताच मुलाला चाकूने मारण्याची धमकी देखील दिली. महिलेनं आरडाओरड केली असता, आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घडलेल्या घटनेनंतर पीडितेनं शांतिनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. 

हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले... आरोपी फरार

सांगण्यात येतंय की, आरोपी हा आठ वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. काही शहरांमध्ये आरोपीविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.