23 वर्षीय तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले... आरोपी फरार

मुंबई तक

Crime News : हिमाचलच्या एका 23 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा पीडितेनं आरोप केला. महिलेनं केलेल्या तक्रारीवरून खरार शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी देखील हिमाचल प्रदेशचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले

point

पीडितेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप

Crime News : पंजाबच्या मोहालीतील खरारमध्ये हिमाचलच्या हिमाचलच्या एका 23 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा पीडितेनं आरोप केला. महिलेनं केलेल्या तक्रारीवरून खरार शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी देखील हिमाचल प्रदेशचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसाला केली मारहाण, नंतर भररस्त्यात गोंधळ घातला, पुढे...

पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले

आरोपीचे ओळख नरेंद्र कुमार अशी झाली असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणात पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पीडितेनं अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आरोपी नरेंद्र कुमार हा बऱ्याच दिवसांपासून तिच्या संपर्कात होता. तिला अज्ञातस्थळी नेऊन तिचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप तक्रारीत केला. 

पीडितेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप

यानंतर त्याने संबंधित अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आणि ब्लॅकमेल केले. आरोपीने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा पीडितेनं आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

हे ही वाचा : अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती

हे वाचलं का?

    follow whatsapp