मुलाचं लग्न तोंडावर असताना 37 वर्षीय मामी 21 वर्षीय भाच्यासोबत गेली पळून, नवरा आठवणीत झाला वेडा
Viral news : विवाहाची तयारी सुरु असताना काही आठवड्यांपूर्वीच 37 वर्षीय महिला तिच्या 21 वर्षीय भाच्यासोबत पळून गेली होती. या प्रकरणात पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआरआय नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मामी भाच्यासोबत गेली पळून
नवऱ्याने सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली
पत्नी आणि संबंधित मुलामध्ये 16 वर्षांचा फरक
Viral news : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या पालीमुकीयामपूर भागातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका विवाहाची तयारी सुरु असताना काही आठवड्यांपूर्वीच 37 वर्षीय महिला तिच्या 21 वर्षीय भाच्यासोबत पळून गेली होती. या प्रकरणात पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआरआय नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा : महिलेला बघून तरुणामध्ये जागा झाला सैतान, चाकूचा धाक दाखवून शरीरसुखाची केली मागणी, एवढ्यावरच न थांबता...
मामी भाच्यासोबत गेली पळून
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, पीडितेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, त्याची पत्नी 25 जानेवारी रोजी तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती. आई वडिलांच्या घरातून परतत असताना, वाटेत तिला तिचा पुतण्या विक्रम भेटला होता. या प्रकरणात असा आरोप आहे की, विक्रमने तिला फूस लावून आपल्यासोबत नेले असता, ती महिला बेपत्ता झाली.
नवऱ्याने सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली
पीडितेच्या पतीच्या म्हणण्यांनुसार, पत्नीच्या शोधासाठी त्याने गावकरी, सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्याने कुटुंबाशी अथवा पुतण्याशी चौकशी केली असता, त्याला धमकी देण्यात आली. नवरा व्यथित होऊन त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पत्नी आणि संबंधित मुलामध्ये 16 वर्षांचा फरक
पतीने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि संबंधित मुलामध्ये 16 वर्षांचा फरक आहे. 6 मार्च रोजी त्याच्या मुलाचा विवाह होता आणि कुटुंब लग्नाच्या तयारीतच होते. मंगळसूत्र, चैन, पैंजण आणि अंगठया असे दागिने मुलीच्या कुटुंबियांनी खरेदी केले होते. तसेच ते अंदाजे एक लाख रोख रक्कम घेऊन जात गेले. पतीचा आरोप आहे की, विक्रम हा दागिने घेऊन बायकोला घेऊन पळून गेला.










