सासऱ्याने 25 वर्षीय सुनेच्या खोलीत जाऊन केली 'तसली' मागणी, नकार दिल्यावर केलं भयानक कृत्य
Crime News : इसापूर खुरगन गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची तिच्याच घरात हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला सासरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी शवविच्छेदनातून या हत्येची पुष्टी करण्यात आली. यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सासऱ्याने सुनेचा विश्वास मिळवत केली जबरदस्ती
पोलिसांनी आरोपी सासऱ्याला केली अटक
Crime News : उत्तर प्रदेशातील कैराना येथील इसापूर खुरगन गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची तिच्याच घरात हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला सासरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी शवविच्छेदनातून या हत्येची पुष्टी करण्यात आली.
हे ही वाचा : महिलेला बघून तरुणामध्ये जागा झाला सैतान, चाकूचा धाक दाखवून शरीरसुखाची केली मागणी, एवढ्यावरच न थांबता...
सासऱ्याने सुनेचा विश्वास मिळवत केली जबरदस्ती
संबंधित प्रकरणात आरोप आहे की, सासऱ्याने सुनेचा विश्वास मिळवल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली. तिने प्रतिकार केला असता, नंतर तिची हत्या केली. सासरा अब्बासने हुशारीने तारेचा वापर करून आतून दरवाजा बंद केला, ज्यामुळे मुस्कराने आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी आरोपी सासऱ्याला केली अटक
दुसऱ्याच दिवशी, सासरा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि हुंड्यामुळे झालेल्या आत्महत्येची कहाणी सांगू लागला होता. पोलिसांनी त्याची काटेकोरपणे चौकशी केली असता अब्बासने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. त्याने घटनेच्या रात्रीची संपूर्ण कहाणी पोलिसांनी सांगितली. पोलिसांनी आता अब्बास आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आहे.
हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले... आरोपी फरार
महिला आता घरातच सुरक्षित नाहीत, यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या घटनेनं माणुसकीला काळीमा फासली गेली आहे. सुनेला मुलीप्रमाणे मानले जाते, पण सुनेसोबत सासऱ्यान नको तेच कृत्य केलं.










