Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय भारत सरकारच्या कंपनीत नोकरी... 'या' उमेदवारांसाठी तर सुवर्णसंधी

मुंबई तक

• 01:40 PM • 22 Feb 2026

भारत सरकारच्या महारत्न पीयूसी कंपनी गॅस ऑथरिटी ऑफ इंडिया (Gas Authority of India Limited) 'गेल'कडून एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

'या' उमेदवारांसाठी तर सुवर्णसंधी

'या' उमेदवारांसाठी तर सुवर्णसंधी

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोणत्याही परीक्षेशिवाय भारत सरकारच्या कंपनीत नोकरी...

point

'या' उमेदवारांसाठी तर सुवर्णसंधी

Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्या उमेदवारांकडे GATE स्कोरकार्ड असेल, ते उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. भारत सरकारच्या महारत्न पीयूसी कंपनी गॅस ऑथरिटी ऑफ इंडिया (Gas Authority of India Limited) 'गेल'कडून एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 20 फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 18 मार्च 2026 पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

या नव्या भरतीअंतर्गत केमिकल, इंस्ट्रूमेंट्स, इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल ट्रेडमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या निवड प्रक्रियेत गेट स्कोर अधिक महत्त्वाचं असून याआधारे उमेदवारांना मुलाखत (इंटरव्ह्यू) किंवा ग्रुप डिस्कशनसाठी आमंत्रित केलं जाईल. 

काय आहे पात्रता? 

1. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) : उमेदवारांकडे केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/ केमिकल टेक्नोलॉजी आणि पॉलीमर साइंस/ केमिकल टेक्नोलॉजी अँड प्लास्टिक टेक्नोलॉजी क्षेत्रात किमान 65 टक्के गुणांसह इंजीनिअरिंगमध्ये बॅचलर्स डिग्री असणं आवश्यक आहे. 

2. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इंस्ट्रूमेंटेशन) : या पदासाठी उमेदवारांकडे  इंस्टूमेंटेशन/ इंस्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशन/ इलेट्रिकल अँड इंस्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किमान 65 टक्के गुणांसह इंजीनिअरिंग डिग्री असणं गरजेचं आहे. 

3. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : यासाठी उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पावर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड पावर विषयात किमान 65 टक्के गुणांसह बॅचलर्स इंजीनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे. 

4. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मॅकेनिकल) : मॅकेनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल/ मॅनुफैक्चरिंग/ मॅकेनिकल अँड ऑटोमोबाइल मध्ये किमान 65 टक्के गुणांसह उमेदवारांकडे इंजीनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा: Astrology: गुरू आणि शुक्र ग्रहाच्या विशेष गोचरमुळे धनाचा वर्षाव! कोणत्या राशींना मिळणार हे वरदान?

याव्यतिरिक्त, बी.ई/ बीटेक/ बीएससी इंजीनियरिंगची डिग्री पूर्ण केलेले उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांकडे 5 वर्षीय बी.ई/ बीटेक + एम.ई/ एमटेक इंटीग्रेटेड डुअल इंजीनिअरिंगची डिग्री असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील. तसेच, संबंधित पेपरमध्ये उमेदवारांनी 2026 ची गेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यासाठी 2025 चं गेट स्कोरकार्ड व्हॅलिड नसेल.  

हे ही वाचा: 'हसू झालंय माझं..,जीव होता तो माझा..', सोलापुरातल्या पायलची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट; तिघांना अटक

वयोमर्यादा 

या भरतीसाठी उमेदवारांसाठी 26 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून 18 मार्च 2026 तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. या पदांसाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना 60,000 रुपये ते 1,80,000 रुपये बेसिक पगार मिळेल. 
तसेच, GATE 2026 स्कोरकार्डच्या आधारे उमेदवारांचं शॉर्टलिस्टिंग केलं जाईल आणि त्यानंतर मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून त्यांची अंतिम निवड केली जाईल. या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.