छत्रपती संभाजीनगर : मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसाला केली मारहाण, नंतर भररस्त्यात गोंधळ घातला, पुढे...

मुंबई तक

• 01:21 PM • 23 Feb 2026

Chhatrapati Sambjajinagar : छत्रपती संभाजीनगरात एका वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. मद्यधुंद पुरुष आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Chhatrapati Sambjajinagar

Chhatrapati Sambjajinagar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपी मद्यधुंद अवस्थेत करत होता वाह्यात चाळे

point

पोलीस संतोष खरातला धक्काबुक्की आणि कानशिलात लगावली

Chhatrapati Sambjajinagar : इसरार चिस्टी - छत्रपती संभाजीनगरात एका वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मद्यधुंद पुरुष आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मद्यधुंद पुरूष आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती

आरोपी मद्यधुंद अवस्थेत करत होता वाह्यात चाळे

घडलेल्या घटनेनुसार, वाहतूक पोलीस संतोष खरात हायकोर्ट सिग्नलवर कर्तव्य बजावताना सोमनाथ मुरलीधर गिरी नावाचा तरुण डिव्हायडरजवळ गाडी चालवत होता. त्याला थांबवून चौकशी करण्यात आली, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. 

पोलीस संतोष खरातला धक्काबुक्की आणि कानशिलात लगावली

प्रकरणाची कारवाई सुरु करताच, तरुणाने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली, नंतर शिवीगाळ केली. एवढंच नाहीतर दोन दिवसांत धडा शिकवेल अशी धमकी दिली आणि वाहतूक पोलीस संतोष खरातवर हल्ला केला. नंतर पत्नीला घटनास्थळी बोलवून गोंधळ घातला, धक्काबुक्की केली आणि तक्रारदाराच्या कानशि‍लात लगावली. 

हे ही वाचा : पप्पा सगळं तिचंच ऐकतात! बहिणीची शॉलने गळा आवळून केली हत्या, भावानं कसा रचला कट?

सोमनाथ हा रस्त्याच्या मध्यभागी पडून राहिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस आणि दमानी पथक घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले, त्यांच्यांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करू लागले आहेत.