पप्पा सगळं तिचंच ऐकतात! बहिणीची शॉलने गळा आवळून केली हत्या, भावानं कसा रचला कट?

मुंबई तक

Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात घडली आहे. वडिलांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून एका भावाने आपल्या सख्ख्या विवाहित बहिणीची शॉलने गळा आवळून हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने बहिणीच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पप्पा सगळं तिचंच ऐकतात!

point

बहिणीची शॉलने गळा आवळून केली हत्या

point

भावानं कसा रचला कट?

Crime News : बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात घडली आहे. वडिलांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून एका भावाने आपल्या सख्ख्या विवाहित बहिणीची शॉलने गळा आवळून हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने बहिणीच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हे ही वाचा: 25 वर्षीय सुनेवर सासऱ्याची जबरदस्ती! महिला गाढ झोपेत असताना गुपचूप खोलीत शिरला अन् सकाळी भलतंच दृश्य...

'बहिणीचे  अपहरण केले'

रामनरेश यांनी आपली 26 वर्षीय मुलगी उमाकांती हिचा विवाह नोव्हेंबर 2025 मध्ये केला होता. मंगळवारी रामनरेश यांनी आपला मुलगा अजय (22) याला ई-रिक्षा देऊन उमाकांतीला तिच्या सासरहून आणण्यासाठी पाठवले होते. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अजय एकटाच घरी परतला आणि त्याने रडत सांगितले की, 'काही अज्ञात तरुणांनी मला अमली पदार्थ देऊन बहिणीचे अपहरण केले आहे.' या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.

'या' कारणामुळे केली हत्या

पोलिस अधीक्षक जे.पी. सिंह यांनी तपासाचे चक्रे फिरवली असता अजयने सांगितलेल्या घटनास्थळावर अपहरणाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तसेच, अजय आणि उमाकांती यांच्या मोबाईलचे लोकेशन त्याने सांगितलेल्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच मार्गावर आढळून आले. संशय बळावल्याने पोलिसांनी रात्री दीड वाजता अजयची कडक चौकशी केली, तेव्हा त्याने बहिणीची हत्या केल्याचे कबूल केले. 'बहीण घरातील किरकोळ गोष्टींवरून वाद घालायची आणि वडील तिचेच ऐकायचे. तिच्याच सांगण्यावरून वडिलांनी मला आठवड्यापूर्वी घराबाहेर काढले होते,' असं कारण अजयने सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp