"घरातच बसून राहता आणि लग्न सुद्धा होत नाही..." सततच्या टोमण्यांना वैतागून मुलींनी जन्मदात्या बापालाच संपवलं!

दोन बहिणींनी मिळून आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. चौकशीदरम्यान मुलींनी सांगितलं की, वडिलांच्या वागण्याला आणि टोमण्यांना कंटाळून त्यांनी हे कृत्य केलं.

मुलींनी जन्मदात्या बापालाच संपवलं!

मुलींनी जन्मदात्या बापालाच संपवलं!

मुंबई तक

• 11:56 AM • 24 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सततच्या टोमण्यांना वैतागून मुलींनी जन्मदात्या बापालाच संपवलं!

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये दोन बहिणींनी मिळून आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या हत्याप्रकरणाचं गूढ उकललं असून दोन्ही मुलींना अटक केल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान आरोपी मुलींनी पोलिसांसमोर कबूली दिली की, "आमचे वडील सतत आम्हाला टोमणे मारायचे. ते म्हणायचे की, 'तुम्ही घरातच बसून राहता आणि तुमचं लग्न सुद्धा होत नसल्यामुळे समाजात बदनामी होत आहे.' वडिलांच्या या बोलण्याला वैतागून आम्ही त्यांच्या हत्येचा कट रचला."

हे वाचलं का?

संबंधित घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. मोरणा येथील रहिवासी असलेले 60 वर्षीय राम प्रसाद हे त्यांच्या घरात झोपले होते आणि सोमवारी सकाळी कुटुंबातील इतर सदस्यांना जाग आल्यानंतर त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं. पलंगाच्या खाली रक्ताने माखलेल्या अवस्थेत राम प्रसाद यांचा मृतदेह आढळला. निर्घृणपणे त्यांचा गळा चिरण्यात आला होता आणि पोटावर सुद्धा चाकूने वार करण्यात आल्याच्या जखमा आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

हे ही वाचा: कल्याण : श्वान चावल्याने मानसिक संतुलन बिघडलं; सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

वडिलांवर चाकूने वार करून संपवलं 

घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद वस्तूंमुळे पोलिसांना कुटुंबातील सदस्यांवर संशय आला आणि त्यांनी राम प्रसादच्या दोन मुली, 32 वर्षीय कोमल आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. कठोर चौकशीदरम्यान, चौकशीदरम्यान, दोन्ही बहिणींनी त्यांचा गुन्हा कबूल केला. गेल्या दोन दिवसांपासून ते त्यांच्या वडिलांना संपवण्याचा कट रचत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी रात्री संतापाच्या भरात त्यांनी त्यांच्या वडिलांवर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. 

हे ही वाचा: सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे 'शुक्रादित्य राजयोग'... 'या' राशींच्या लोकांसाठी गेम-चेंजर ठरणार! करिअर अन् संपत्तीत वाढ...

हत्येनंतर, दोन्ही मुलींनी पुरावे नष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. दोघांनी त्यांचे रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येत वापरलेला चाकू एका कापडात बांधला आणि तो घरातील गवताच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. आता पोलिसांनी त्या वस्तू जप्त केल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली की, प्राथमिक तपासात कुटुंबातील सदस्यांवर संशय निर्माण झाला. चौकशीदरम्यान मुलींनी सांगितलं की, वडिलांच्या वागण्याला आणि टोमण्यांना कंटाळून त्यांनी हे कृत्य केलं. दोन्ही आरोपी मुलींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे."

    follow whatsapp