Crime News : नात्याला काळिमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या थोरल्या मुलावर बलात्काराचा खळबळजनक आरोप केला आहे. पीडित महिलेच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपी मुलाला अटक केली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
निर्जनस्थळी घेऊन गेला अन्...
पीडितेने पोलिसांना दिलेल्या अर्जात घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. बुधवारी (29 जुलै) तिचा थोरला मुलगा तिला प्रसाद देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी घेऊन गेला, तिथे त्याने बलात्कार केला, असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली. या प्रकरणात आरोपीच्या वडिलांचे, म्हणजेच महिलेच्या पतीचाही जबाब समोर आला असून त्यांनी पत्नीच्या आरोपांचे समर्थन करत मुलाच्या वर्तनाचा पर्दाफाश केला आहे. आपला मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर व्यसनाच्या आहारी गेला असून, तो दररोज घरात शिवीगाळ आणि मारहाण करतो, त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी वडिलांनीही केली आहे.
हे ही वाचा : 'भाजपमध्ये ये अन्यथा काही करुन टाकू', ऑफर, धमक्या, पहिल्यांदा गौप्यस्फोट
'ती माझी सावत्र आई'
दुसरीकडे, आरोपी मुलाने मात्र आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान त्याने तक्रारदार महिला ही आपली सख्खी आई नसून सावत्र आई असल्याचे म्हटले आहे. आपण असा कोणताही अपराध केला नसून आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तसेच आरोपीच्या पत्नीनेही आपल्या पतीची बाजू घेत, बलात्काराचे आरोप पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला आहे.
हे ही वाचा : संजय राऊत फिल्म बनवणार, संसदेतच घोषणा, भाषण करत असताना जोरदार राडा
पोलिसांनी काय सांगितले?
या प्रकरणाची अधिकृत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने तिच्या मोठ्या मुलावर अत्याचाराचा आरोप करणारी तक्रार दिली होती. प्राप्त अर्जाच्या आधारे तात्काळ संबंधित कलमांनुसार एफआयआर (FIR) नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT












