डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट! पुढे सगळं अंगलट आलं अन्...

मुंबई तक

31 Jul 2026 (अपडेटेड: 31 Jul 2026, 02:58 PM)

bengaluru crime news : बंगळुरूमध्ये एका महिलेने एका कंपनीच्या डिलिव्हरी पार्टनरवर वारंवार घरात प्रवेश करण्याचा आग्रह धरल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कंपनीने संबंधित डिलिव्हरी पार्टनरवर कारवाई केल्याचे महिलेने सांगितले.

bengaluru crime news

bengaluru crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट!

point

पुढे सगळं अंगलट आलं अन्...

bengaluru crime news : बंगळुरूमध्ये एका महिलेने  एका कंपनीच्या डिलिव्हरी पार्टनरविरोधात गंभीर आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित डिलिव्हरी पार्टनरने डिलिव्हरीसाठी घरी आल्यानंतर वारंवार घरात येण्याची विनंती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आपण स्पष्टपणे नकार दिल्यानंतरही त्याने आग्रह सुरूच ठेवला, त्यामुळे आपण घाबरल्याचे महिलेने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या घटनेनंतर तिने झेप्टोकडे चौकशीची मागणी करत कंपनीच्या तक्रार निवारण यंत्रणेवरही टीका केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : विरोधी पक्षांना यश येत नाही, मग सीजेपीच्या आंदोलनालाच यश का आलं? अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच

बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न

महिलेच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी पार्टनर ऑर्डर देण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. महिलेने त्याला पाण्याची बाटली देत ती स्वतःकडेच ठेवण्यास सांगितले. काही वेळाने तो पुन्हा आला आणि आणखी पाणी मागितल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यानंतर त्याने पाच मिनिटांसाठी घरात येऊ देण्याची विनंती केली. मात्र महिलेने त्याला स्पष्ट नकार देत घराबाहेर पुरेशी जागा असल्याचे सांगितले आणि बाहेरच बसण्यास सांगितले.

हेही  वाचा : 'भाजपमध्ये ये अन्यथा काही करुन टाकू', ऑफर, धमक्या, पहिल्यांदा गौप्यस्फोट

 डिलिव्हरी पार्टनरने गेटवर जोरात ठोकर मारल्या, महिला प्रचंड घाबरली

महिलेने आरोप केला की, आपण प्रत्येक वेळी नकार दिल्यानंतरही डिलिव्हरी पार्टनर घरात येण्याचा आग्रह करत राहिला. आपण गेट बंद करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने अनेक वेळा डोअरबेल वाजवली आणि पुन्हा काही मिनिटांसाठी घरात येण्याची विनंती केली. त्यामुळे आपण घाबरून घराचा दरवाजा बंद केला आणि घरातच थांबल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर संबंधित डिलिव्हरी पार्टनरने गेटवर जोरात ठोकर मारण्यास सुरुवात केल्याचाही आरोप तिने केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड घाबरल्याचे तिने व्हिडिओमध्ये नमूद केले.

यानंतर शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलेने झेप्टोने या प्रकरणात कारवाई केल्याचा दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार, कंपनीने संबंधित डिलिव्हरी पार्टनरला तिच्या घराजवळ येण्यास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला असून त्याची आयडीही बंद करण्यात आली आहे. तसेच आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केली नसल्याचेही तिने स्पष्ट केले. डिलिव्हरी पार्टनरची कोणतीही माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांकडे जाणे शक्य झाले नाही, असे तिने सांगितले. याच महिन्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टच्या एका डिलिव्हरी एजंटला एका महिलेच्या घरात परवानगीशिवाय प्रवेश करून शौचालय वापरण्याच्या बहाण्याने लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.