बँकेत काम करणाऱ्या तरुणीसोबत भयंकर घडलं, अपघातासारखं वाटणारं कारण भलतंच

मुंबई तक

• 09:00 AM • 31 Jul 2026

crime news : मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणाने प्रेयसीची हत्या केली. खूनानंतर तरुणाने कट रचत आत्महत्या केल्याचे भासवून तिला जाळून टाकले. मात्र, पोस्टमॉर्टम अहवालातून हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी सांगितलं की, बँक कर्मचारी तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बँकेत काम करणाऱ्या तरुणीसोबत भयंकर घडलं

point

गळा दाबल्याने बँक कर्मचाऱ्याचा अंत 

Crime News : मध्य प्रदेशातील इंदौर येथून हत्येचं गंभीर प्रकरण उघडकीस आलेलं आहे. मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणाने प्रेयसीची हत्या केली. खूनानंतर तरुणाने कट रचत आत्महत्या केल्याचे भासवून तिला जाळून टाकले. मात्र, पोस्टमॉर्टम अहवालातून हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी सांगितलं की, बँक कर्मचारी तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. अशातच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 12 वर्षीय मुलाचा बाराव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू, शेजारच्यांकडून कुटुंबाला माहिती

बँक कर्मचाऱ्याचा जळालेला मृतदेह

राजा रघुवंशी आणि राजीव बमानिया हत्याकांडानंतर आता इंदौर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, 26 जुलै रोजी पोलीस ठाणे परिसरातील तपेश्वरी बाग येथे भाड्याच्या खोलीत एका बँक कर्मचाऱ्याचा जळालेला मृतदेह आढळून आला. नंतर पोलिसांनी घटनास्थळावरून प्रत्येक पुरावा गोळा केला. शवविच्छेदन आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे मृत्यूचे एकूण प्रकरण समोर आले. 

गळा दाबल्याने बँक कर्मचाऱ्याचा अंत 

शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले की, तरुणाचा मृत्यू हा आगीमुळे झाला नसून गळा दाबल्याने झाला होता. याचा अर्थ असा की, मृतदेह जाळण्यात आला होता, पण खून आधीच झाला होता. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ तपासण्यास सुरूवात करण्यात आली. एक तरुण पेट्रोलचे कॅन घेऊन घटनास्थळावरून जाताना दिसला. 

तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला होता. अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, संशयिताची ओळख ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथील रहिवासी मयंक शाक्य अशी पटली होती. गेल्या पाच वर्षांपासून मृत महिलेचा जवळचा मित्र होता. 

हे ही वाचा : महिला शिक्षिकेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, नवऱ्याला संपवण्याची धमकी

दरम्यान, चौकशी सुरू असताना, संशयिताने सांगितलं, दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून वाद झाला होता. जेव्हा महिलेनं लग्नास नकार दिला असता, त्याने रागाच्याभरात तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांची दिशाभूल करत ही आत्महत्या की अपघात याचा पोलीस शोध घेत आहेत. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.