Nagpur Cricketer Suicide News : क्रिकेट विश्वातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला क्रिकेटरने निवड न झाल्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना विदर्भाच्या नागपूर परिसरातील आहे. महिला क्रिकेटरची सुसाईड नोट देखील समोर आली आहे. ज्यात तिने लिहिलं की, विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड न झाल्याने नैराश्यात येऊन जीवन संपवत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरची कथित सुसाईड नोट व्हायरल, भाजप नेत्याचं नाव घेत गंभीर आरोप
महिला क्रिकेटरनं गळफास घेत संपवलं जीवन
प्राथमिक तपासातून समोर आलं की, विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये महिला क्रिकेटर अदिती मोरेश्ववर (वय 17) हिची निवड झाली नव्हती. त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं. या घटनेनं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी पहाटे साडे पाच वाजता नागपूर शहरातील लक्ष्मीनगर स्थित उमालक्ष्मी अपार्टमेंट येथील राहत्या घरात घडला.
अदिती मूळची अकोल्यातील रहिवासी
अदिती ही मूळची अकोला येथील रहिवासी आहे. मागील दोन वर्षांपासून तिने आपल्या आईसोबत नागपूर येथे राहण्याचा निश्चय केला. तिने क्रिकेट क्षेत्रात करियर करण्याच्या हेतूने कठोर परिश्रम केले. तिने नागपूरमध्ये राहून सुर्वे क्रिकेट अकॅडमी जॉईन केली आणि कष्ट घेण्यास सुरूवात केली.
सुसाईड नोट आढळली
प्राथमिक माहितीनुसार, नुक्त्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंची निवड प्रक्रिया केली होती. त्यात निवडक खेळाडूंना संधी देण्यात आली, ज्यात अदितीचे नाव नव्हते. अशातच ती नैराश्यात गेली होती. पोलिसांना तपासादरम्यान घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली होती.
हे ही वाचा : नववीच्या मुलाला घरातून बोलावलं, विटेनं हल्ला करत छातीत चाकूनं भोसकलं
आत्महत्येची सूचना मिळताच, बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला आहे.
ADVERTISEMENT












