दोन महिलांनी मिळून पुरुषाची छेड काढली, संतापलेला पुरुष पोलीस ठाण्यात गेला अन्..

मुंबई तक

30 Jul 2026 (अपडेटेड: 30 Jul 2026, 04:26 PM)

Varanasi crime news : वाराणसीमध्ये पुरुषांना अश्लील इशारे करून छेडछाड केल्याच्या तक्रारींनंतर अँटी रोमिओ पथकाने दोन तरुणींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Varanasi crime news

Varanasi crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन तरुणींनी मिळून पुरुषाची छेड काढली

point

संतापलेला पुरुष पोलीस ठाण्यात गेला अन्..

Varanasi crime news : बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, कॉलेजच्या बाहेरील रस्ता अशा ठिकाणी अनेकदा रोड रोमिया दिसतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडणं, अश्लिल हावभाव करणं, टॉन्ट मारणं अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून सुरु असतात. अशा रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. ही पथकं अशा रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवत असतात. पण आता जग बदलतंय आणि आजूबाजूच्या गोष्टी देखील बदलत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आता लिंगभेद राहिलेला नाही. वाराणसीमधून चक्क दोन महिलांनी अनेक पुरुषांची छेड काढल्याची घटना  समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी

अश्लिल इशारे करताना पकडल्या गेल्या अन्..पुढे काय घडलं? 

रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या पिलरजवळ थांबवून दोन महिला पुरुषांना छेडत असल्याचा प्रकार समोर आलाय. या महिला या पिलरच्या बाजूला थांबून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना छेडणं आणि अश्लिल इशारे करताना पकडल्या गेल्यात आणि त्यांच्यावर आता गुन्हा देखील दाखल झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात.. 

हेही वाचा : Ajinkya Rahane Networth : मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स... मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?

आजूबाजूच्या पुरुषांना छेडण्याचं काम करायच्या 

तर ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधल्या कँन्ट रेल्वे स्टेशनजवळची. तर त्याचं झालं असं की या कॅन्ट रेल्वे स्टेशनच्या समोर एक ओवर ब्रिज आहे. या ओव्हर ब्रिजच्या पिलर क्रमांक 57 आणि 60 च्या मध्ये दोन मुली उभ्या राहायच्या. एखाद्या रोडछाप रोमियोसारख्या त्या येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना छेडायच्या. त्यांना टॉन्ट मारणं, अश्लील बोलणं, अश्लील हावभाव करणं असं त्या करत होत्या. त्याचा हा कारनामा बराच काळ सुरु होता. सुरुवातीला पुरुषांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण त्या महिलांचा त्रास सुरुच होता. ट्रेनमधून येणाऱ्या, आजूबाजूच्या पुरुषांना छेडण्याचं काम त्यांचं सुरुच होतं. 

अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून काही पुरुषांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रार मिळाल्यानंतर खरंतर पोलीस पण बुचकळ्यात पडले. युवती पुरुषांना छेडतायेत हे कळाल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण तक्रार आली तर कारवाई तर करावी लागेल. त्यातही तक्रार गंभीर आहे, छेडछाडीची. मग काय योगीजींच्या पोलीस दलाने या रोड ज्युलियेट्सचा पर्दाफाश करायचं ठरवलं. युपी पोलीसांची अँन्टी रोमियो स्कॉड त्यांनी घटनास्थळी पोहचली.
या स्कॉडला त्या युवती छेडखानी करताना, अश्लील हावभाव करताना आढळून आल्या. मग काय योगिजींच्या पोलिसांनी कायद्याचं कठोर पालन करायचं ठरवलं. या अँन्टी स्कॉडने त्या दोन युवतींना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील एका महिलेच वय 42 वर्ष तर दुसऱ्या तरुणीचं वय 28 वर्ष आहे. त्यांनी 50 ते 60 पुरुषांना छेडल्याचा आरोप करण्यात आला आहे.  या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढची कारवाई सुरु केली आहे. आता या युवतींवर काय कारवाई होते आणि पोलीस अशा छेडखानी करणाऱ्यांचा बंदोबस्त करतात का हे पाहावं लागेल.