'आईने आत्महत्या केली नाही...' मुली पाच वर्ष लढल्या; अखेर भयानक सत्य समोर

मुंबई तक

• 09:47 AM • 30 Jul 2026

2021 मध्ये बिहारमधील बेगुसराय येथील कस्तुरबा गांधी निवासी शाळेच्या वॉर्डन रिंकू कुमारी यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे भासवून पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र, त्यांच्या मुलींनी केलेल्या पाच वर्षांच्या संघर्षानंतर आणि उच्च न्यायालयाने पुनर्तपासाचे आदेश दिल्यानंतर, संपूर्ण चित्रच पालटले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईने आत्महत्या केली नाही...

point

मुली पाच वर्ष लढल्या

point

अखेर भयानक सत्य समोर

Crime News : 4 एप्रिल 2021 रोजी बेगूसराय येथील कस्तूरबा गांधी निवासी शाळेतील वॉर्डन रिंकू कुमारी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. स्थानिक पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून ही आत्महत्या असल्याचे घोषित करत काही काळातच प्रकरण बंद केले होते. मात्र, रिंकू कुमारी यांच्या तीन मुलींनी पोलिसांच्या या कथेवर कधीही विश्वास ठेवला नाही. आईची हत्याच झाली आहे यावर त्या ठाम होत्या. सलग पाच वर्षे पोलीस ठाण्याचे फेरे मारणे, अधिकाऱ्यांना अर्ज देणे आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर अखेर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाने प्राथमिक तपासातील त्रुटी पाहून एप्रिल 2026 मध्ये पुन्हा तपासाचे आदेश दिले.

हे वाचलं का?

पाच वर्षांपूर्वीची कहाणीच बदलली

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मगध रेंजचे आयजी विकास वैभव यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना झाली आणि 13 जुलैपासून नव्याने तपास सुरू झाला. फॉरेन्सिक अहवाल, वैद्यकीय सल्ला आणि घटनास्थळाच्या तांत्रिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांचा बनाव उघडा पडला. आयजी विकास वैभव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू कुमारी यांनी आत्महत्या केली नसून आधी त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला आणि नंतर तो आत्महत्येचा प्रकार वाटावा म्हणून मृतदेह फाशीच्या फंद्याला लटकवण्यात आला होता. या तपासाने पाच वर्षांपूर्वीची पोलिसांची संपूर्ण कहाणीच बदलून टाकली.

हे ही वाचा : लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले, धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं

15 लाखांचा व्यवहार आणि हत्या

या हत्येमागे 15 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मृत रिंकू कुमारी यांनी त्यांच्याच गावातील कौशल कुमार याला जमिनीच्या व्यवहारासाठी सुमारे 15 लाख रुपये दिले होते. जेव्हा त्यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा कौशलने शाळेचा काळजीवाहू (गार्ड) अजित कुमार बबलू याच्याशी हातमिळवणी करून हत्येचा कट रचला. घटनेच्या वेळी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले होते. एसआयटीने या दोन्ही आरोपींना अटक केली असून, सुरुवातीच्या तपासात गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या तत्कालीन तपास अधिकाऱ्याची भूमिकाही आता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

हे ही वाचा : 'भाजप कार्यकर्त्यांची कॉमेडी नाही...' सुप्रिया सुळे का भडकल्या?

मुलींचा लढा यशस्वी

आईला न्याय मिळवून देण्यासाठी पाच वर्षे लढा देणाऱ्या रिंकू कुमारी यांची मोठी मुलगी तेजस्विनी आणि दुसरी मुलगी चेतना यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी मृतदेहाची अवस्था पाहून त्यांना हत्येचा संशय आला होता. मुलींनी हार न मानल्यामुळेच आज हे सत्य समोर आले आहे. ही घटना केवळ एका हत्येचा उलगडा करणारी कथा नसून, जर या मुलींनी लढा सोडून दिला असता, तर एका आईची हत्या कायमची 'आत्महत्या' म्हणून फाइलींमध्ये बंद राहिली असती, हा गंभीर प्रश्नही उपस्थित करते.