Crime News : गाझियाबादमध्ये मधुबन बापूधाम क्षेत्रा राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेवर मेरठच्या एका तरुणाने मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व्हिडिओ बनवून तिला अनेकदा ब्लॅकमेल देखील केल्याचा पीडितेचा आरोप आहे. तिला मारहाणीची धमकी देण्यात आली. गाजियाबाद पोलिसांनी आरोपी तरुणासह 5 लोकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बायकोचे दोन दिरांसोबत संबंध, नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष मिसळल्याचा आरोप
तरुणाचा महिला शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार
पीडित महिला शिक्षिकेनं सांगितलं की, तरुण हा विवाहित होता. तरुणाने आपल्या लग्नापूर्वी महिलेशी मैत्री करून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. आरोपीची ओळख आसिफ असल्याचे समजतेय. याच आरोपीने लैंगिक छळ करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी कोर्टात सुरू आहे.
आरोपी तुरूंगातून आला तरीही पीडितेला द्यायचा त्रास
आरोपी असिफ हा तुरुंगातून सुटून आला तरीही, तिला त्रास देत होता. तो आपला भाऊ आरिफ, पत्नी फिजा आणि इतर नातेवाईकांच्या साथीने मिळून न्यायालयात येऊन जबाब बदलण्यासाठी दबाव आणायचा. तो शाळेच्या रिसेप्शनला अनोळखी मुलाचे नाव घेत पालक असल्याचे सांगत फोन करायचा. तिला शिवीगाळ करायचा आणि तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचा.
आरोपीकडून फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची धमकी
संबंधित प्रकरणात पीडितेनं आरोप केला की, आरोपीने तिला त्रास देणं सुरूच ठेवलं. तो वेगवेगळ्या फोननवरून तिला फोन करत राहिलाच. पीडितेनं आरोप केला की, आरोपी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊ लागला. यामुळे पीडितेवर मानसिक त्रास निर्माण होत असून वैवाहिक जीवनावर परिणाम होत आहे.
हे ही वाचा : ऑगस्ट महिन्यात महागोचरची निर्मिती, 'या' राशींचे नशीब उजळेल
संबंधित प्रकरणात आरोपी आसिफ, पत्नी फिजा, भाऊ आरिफ आणि फिझाचा मेहुणा आसिफ व इरफान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT












