Crime News : सरकारी शाळेतील एका 50 वर्षीय शिक्षकाला सहावीतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
शाळेबाहेर गावकऱ्यांचा रास्ता रोको
मंगळवारी (28 जुलै) सकाळी संतप्त पालक आणि गावकऱ्यांनी शाळेबाहेर रस्ता रोको आंदोलन करत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच ब्लॉक शिक्षण अधिकारी सुनील चौबे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. दोषी शिक्षकावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
हे ही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
स्मार्ट क्लासरुममध्ये नेऊन...
प्राथमिक चौकशीनुसार, संबंधित शिक्षक गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थिनीला शाळेच्या स्मार्ट क्लासरूममध्ये एकटे घेऊन जात असे आणि तिच्याशी अश्लील गैरवर्तन करत असे. जर तिने या गोष्टीला विरोध केला, तर शाळेच्या पटावरून तिचे नाव काढून टाकण्याची धमकी तो देत असे. इतकेच नव्हे तर, इतर शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी या वर्तनावर आक्षेप घेतल्यास तो त्यांच्याशीही वाद घालत असे. त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि पालकांनी त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती.
हे ही वाचा : बीड : तू मला का बोलत नाहीस? विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली
शिक्षक निलंबित, पुढे काय?
ब्लॉक शिक्षण अधिकारी सुनील चौबे यांच्या अहवालाच्या आधारे जिल्हा बेसिक शिक्षण अधिकारी मनीष कुमार सिंह यांनी मंगळवारी रात्री संबंधित शिक्षकाला तत्काळ प्रभावाने निलंबित केले. विद्यार्थिनींचे संरक्षण, प्रतिष्ठा आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नवानगरचे ब्लॉक शिक्षण अधिकारी पंकज कुमार सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना 15 दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT












