बीड : तू मला का बोलत नाहीस? विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली

मुंबई तक

beed crime news : बीडच्या परळी येथील शासकीय आयटीआय कॉलेज परिसरात एका झाडाला युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित युवकावर यापूर्वी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

beed crime news
beed crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड : तू मला का बोलत नाहीस?

point

विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथील शासकीय आयटीआय कॉलेज परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : 'आजी, लगेच जाऊन आलो...' चिमुरडा सायकलवरुन गेला, शेजारच्या घरात सापडली बॉडी

 आयटीआय कॉलेज परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाची ओळख परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील रहिवासी आकाश राम खाटिक अशी पटली आहे. आकाश खाटिक याच्याविरोधात यापूर्वी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, त्याचा मृतदेह आयटीआय कॉलेज परिसरात आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू ठेवला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा