प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
mathura crime news : मथुरामध्ये तीन वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप आईवर करण्यात आला आहे. प्रियकराशी बोलताना मुलगा अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा
आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
mathura crime news : मथुरा जिल्ह्यातील बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छौली गावातून आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप त्याच्याच आईवर करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 28 जून रोजी 32 वर्षीय रुची जिंदाल हिने तिचा तीन वर्षांचा मुलगा माधव याचा गळा दाबून जीव घेतला. पती कृष्ण मुरारी गुप्ता घरात नसताना ती तिच्या कथित प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी मुलगा सतत रडत असल्याने तो संभाषणात अडथळा ठरत होता. याच कारणावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : Personal Finance: घर घेणं म्हणजे सर्वोत्तम Investment की हा सर्वात मोठा गैरसमज?
नेमकं काय घडलं?
घटनेनंतर रुचीने मुलाच्या मृत्यूबाबत घरच्यांना आजारपण आणि औषधोपचाराचे कारण सांगितले. तिने पतीला फोन करून मुलगा आजारी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाला सिम्स रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांना पोलिओचे थेंब दिल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला असावा, अशी शंका असल्याने त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. रुचीनेही मृत्यू आजारामुळे झाल्याचेच सांगितल्याने त्यावेळी कोणालाही संशय आला नव्हता.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यलो-ऑरेंज अलर्ट, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट
