'आजी, लगेच जाऊन आलो...' चिमुरडा सायकलवरुन गेला, शेजारच्या घरात सापडली बॉडी

मुंबई तक

• 11:26 AM • 29 Jul 2026

गोरखपूरमधीस एका सराफा व्यापाऱ्याचा 10 वर्षांचा नातू वैभव याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह त्याचा शेजारी सर्वेश याच्या तळघरातून ताब्यात घेतला असून, आरोपीला अटक केली आहे. त्याच्या आईच्या निधनानंतर महिनाभराने घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'आजी, लगेच जाऊन आलो...'

point

चिमुरडा सायकलवरुन गेला

point

शेजारच्या घरात सापडली बॉडी

Crime News : एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सराफा व्यापाऱ्याच्या 10 वर्षीय नातवाचे, वैभव वर्मा याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी (27 जुलै) दुपारपासून बेपत्ता असलेल्या वैभवचा मृतदेह मंगळवारी पहाटे शेजारी राहणाऱ्या सर्वेश भट्ट नावाच्या व्यक्तीच्या घराच्या तळघरात एका गोणीत बांधलेला आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शेजाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

'आजी, लगेच आलो'

मिळालेल्या माहितीनुसार, खजनी येथील सराफा व्यावसायिक लक्ष्मीनारायण वर्मा यांचा नातू वैभव हा सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेतून घरी परतला होता. घरात बॅग ठेवून व गणवेश बदलून तो नवीन सायकल घेऊन घराबाहेर पडला. आजीने जेवणासाठी बोलावले असता 'काही वेळात येतो' असे सांगून तो निघून गेला. मात्र, सुमारे अर्ध्या तासानंतर त्याची सायकल रस्त्याच्या कडेला लावारिस अवस्थेत सापडली आणि जवळच एका शेतात त्याची एक चप्पलही मिळून आली. यावरून कुटुंबाने अपहाराची भीती व्यक्त करत तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ अपहाराचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली.

हे ही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा

तळघरात आढळला मृतदेह

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, दुपारी 2 च्या सुमारास वैभव त्याच्या सायकलवरुन एका गल्लीत जाताना दिसला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) डॉ. कौस्तुभ यांनी बालकाचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली होती. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या महत्त्वाच्या सुगावांच्या आधारे पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या सर्वेश उर्फ बिट्टू शर्मा याला ताब्यात घेतले. सर्वेश हा लहान मुलांना कंप्यूटर शिकवण्याचे काम करतो. पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याच्या सांगण्यावरून त्याच्याच घराच्या तळघरातून वैभवचा मृतदेह गोणीत बंद असलेला आढळला.

हे ही वाचा : 'प्रधान हटवून यांनी पंतप्रधान वाचवला' अखिलेश यांचे भाषणात टॉन्ट, डिंपलही हसल्या

महिन्यापूर्वी आईचे निधन

या दुर्दैवी घटनेमुळे वर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका महिन्यापूर्वीच वैभवच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. तीन भावांमध्ये सर्वात लहान असलेला वैभव सर्वांचा लाडका होता. आईच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच या चिमुकल्याची हत्येची बातमी समोर आल्याने संपूर्ण कुटुंब पुरते कोलमडून गेले आहे. आरोपीने वैभवची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नसून पोलीस फॉरेंसिक पुरावे, शवविच्छेदन अहवाल आणि आरोपीच्या चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.