Virar Crime : प्रवीण नलावडे- विरारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. मुलाच्या उपचाराच्या बहाण्याने एका भोंदूने आईचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीकस आलाय. पीडितेला एका रेस्टॉरंटवर नेण्यात आलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मांत्रिकाचा देखील पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बायकोचे अफेयर असल्याचा पतीला संशय, पंख्याला लटकवून मारलं
मुलावर मंत्राद्वारे उपचाराचं कारण सांगितलं
पोलिसांच्या माहितीनुसार, अजय कळमकर नावाच्या व्यक्तीने पीडित महिलेला तिच्या अल्पवयीन मुलावर मंत्राद्वारे उपचार केले जातात, असं सांगितलं. नंतर मांत्रिक अजय राणा यांच्याकडे नेण्यात आले होते. अजय राणा हा वसई किल्ला परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. मुलाच्या उपचाराच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन करत तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती.
रिसॉर्टवर नेऊन पीडितेचं लैंगिक शोषण
कळंब-अर्नाळा परिसरातील एका रिसॉर्टवर नेऊन पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणाने कळंब-अर्नाळा परिसर हादरून गेला आहे. पीडितेकडून इतर काही गोष्टींची माहिती पोलीस घेत आहेत. पीडितेकडे इतर आणखी काही प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा : लेकीचं मुलावर प्रेम, ओढणीनं गळा आवळून आईनं मुलीला संपवलं
दरम्यान, देशातील असंख्य लोक अंधश्रद्धेच्या बुरख्याआड आहेत. त्यामुळेच अशा घटना घडू लागलेल्या आहेत. मुलाच्या उपचारासाठी महिलेनं डॉक्टरांकडे नेणं आवश्यक होते, मात्र, तिने इतरांच्या सांगण्यावरून मुलाला मांत्रिकाकडे नेल्यानं तिच्यासोबत नको तेच घडलं.
ADVERTISEMENT












