Crime news : उत्तर प्रदेशातील कानपुर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम विवाहानंतर तीन महिन्यातच नवऱ्याने आपल्या बायकोची हत्या केली, तिच्या भांगेत सिंदुर भरलं आणि नंतर स्वत: देखील जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. दरम्यान, दोघांनीही कुटुंबाविरोधात जाऊन विवाह केला होता. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जमिनीवर आढळून आला होता. तसेच पतीचा मृतदेह हा एका फासाला लटकलेल्या स्वरुपात आढळून आला. नंतर पोलिसांनी दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : राहू-केतूचे गोचर, 'या' राशींचे नशीब चमकणार
सौरभ आणि राणीचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध
सौरभ (वय 22) याचे राणी (वय 18) हिच्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. शालिनी ही नातेसंबंधातून त्याची लांबच्या नात्याने एकमेकांचे नातेवाईक होते. दोघांनी कुटुंबाच्याविरोधात जाऊन विवाह केला होता. दोघेजण भाडेतत्त्वावर घर घेऊन राहू लागले होते.
खोलीत राणीचा मृतदेह आणि पंख्याला सौरभ लटकलेल्या स्वरूपात
मृत व्यक्तीच्या नातेवाईकानुसार, मंगळवारी दुपारी दुकानाच्या दुसऱ्यात मजल्यावर राहणारी वृद्ध महिला नीलम कपडे वाळवण्यासाठी छतावर गेली. याचदरम्यान, तिची नजर सौरभच्या खोलीकडे गेली असता, उघड्या खिडकीतून राणीचा मृतदेह आढळून आला. त्याच खोलीतील पंख्याला सौरभचा मृतदेह आढळून आल्याचं दिसून आलं. संबंधित घटनेची माहिती खोली मालक ज्ञान सिंहला या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : 'भाजप कार्यकर्त्यांची कॉमेडी नाही...' सुप्रिया सुळे का भडकल्या?
डीसीपी साउथ, एसीपी नोबस्ता बर्रा पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. डीसीपी साउथ यांनी सांगितलं की, प्राथमिक माहितीतून पत्नीचा गळा चिरून हत्या केली. नंतर स्वत:च जीवन संपवलं. नंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांनी दरवाजा तोडला. नंतर सिंदूर जिकडे तिकडे अस्ताव्यस्त झालं होतं. सौरभच्या डाव्या हाताला सिंदूर लागलेलं आढळून आलं होतं.
ADVERTISEMENT












