Crime News : प्रेम विवाहानंतर नवऱ्याने आपल्याच पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी नवऱ्याने दिवसाढवळ्या ब्युटी पार्लरमध्ये शिरून धारदार शस्त्राने पत्नीवर हल्ला केला आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. हत्येनंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात गेला होता. ही घटना उत्तराखंडमधील गाजीयापुर येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कराड: नीट परीक्षेत अपयश, विद्यार्थीनीनं उंदीर मारण्याच्या वड्या खाऊन संपवलं जीवन
नवऱ्याने बायकोच्या ब्युटी पार्लरमध्ये शिरून केली हत्या
दरम्यान, गाजीपुरच्या शादियाबाद ठाणे क्षेत्रातील मुबारकपुर गावातील रहिवासी असलेली 30 वर्षीय कुसुम देवी ही ब्युटी पार्लर चालवून आपला उदरनिर्वाह करत होती. सोमवारी 7:20 वाजता, नवरा रविकांत उर्फ हनी अचानकपणे पार्लरमध्ये शिरत बायकोवर हत्याराने हल्ला केला. गंभीर जखम झाल्याने पत्नी कुसुमचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हुंड्यात गाडीच्या मागणीवरून कुसुमला त्रास
मृतक कुसुमचा भाऊ जितेंद्र विश्वकर्माने आरोप केला की, अडीच वर्षांपूर्वी त्या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. मात्र, नंतर हुंड्यात गाडी आणि पैशांच्या मागणीवरून कुसुमला सातत्याने त्रास देण्यास सुरूवात केली होती. सोमवारी या वादाचे रुपांतर रक्तरंजित घटनेत झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा स्थानिकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा आरोपींनी त्यांना धमकावून पळवून लावले. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा : विरार हादरलं! मुलाच्या उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाकडून आईचे लैंगिक शोषण
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले. पोलिसांनी तपासातून सांगितले की, ब्युटी पार्लर महिलेची चाकूने वार करत हत्या करण्यात आली होती. नंतर हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू नंतर जप्त देखील करण्यात आला होता. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
ADVERTISEMENT












