कल्याण : श्वान चावल्याने मानसिक संतुलन बिघडलं; सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

मिथिलेश गुप्ता

कल्याण शहरात एका 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि नंतर त्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या
सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

श्वान चावल्याने मानसिक संतुलन बिघडलं

point

सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

point

कल्याण शहरातील धक्कादायक घटना

कल्याण : एका 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि नंतर त्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात घडली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरव यांनी दिली. 

आयश विश्वनाथ अमीन (वय 30 वर्षे) अशी मृत व्यक्तीची ओळख समोर आली आहे. प्रकरणातील खळबळजनक बाब म्हणजे, श्वान चावल्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये पोलिसांना आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा: पुणे : पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली, पण तरुणीने पळ काढताना इमारतीच्या खिडकीतून उडी मारली अन् जीव गेला

भटक्या कुत्र्याने पायाला चावा घेतला... 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत आयश हे कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, B विंगमधील फ्लॅट क्र. 903 मध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते. आयश हे गेल्या आठ वर्षांहून अधिक काळापासून भारत बँकेच्या ठाणे शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला होता. त्यानंतर, त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतलं असून मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. 

हे ही वाचा: सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे 'शुक्रादित्य राजयोग'... 'या' राशींच्या लोकांसाठी गेम-चेंजर ठरणार! करिअर अन् संपत्तीत वाढ...

रेबिजची लक्षणं दिसल्याने आत्महत्या... 

दरम्यान, रविवारी  सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना आयश यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं व आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. ही घटना अत्यंत वेदनादायक असून नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा धोका टाळण्यासाठी पूर्ण लसीकरण (Anti-Rabies Vaccine) वेळेत घेणं अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी पूर्ण उपचार घेतल्यास रेबिज पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तसेच, कुत्रा चावल्यानंतर भीती, गैरसमज किंवा लक्षणांबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असून मानसिक तणाव वाढल्यास कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीला भावनिक आधार देणे आणि आवश्यक असल्यास समुपदेशनाची मदत घेणेही तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp