वसई : 32 कोटींसाठी उद्योगपतीच्या हत्येचा कट, थेट गाठून गोळ्या झाडल्या, पण...

मुंबई तक

vasai businessman murder conspiracy : वसईतील एका उद्योगपतीच्या हत्येचा कट वालीव पोलिसांनी उधळून लावला आहे. 32 कोटी रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीतील भागीदारानेच हा कट रचल्याचा आरोप असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

vasai businessman murder conspiracy
vasai businessman murder conspiracy
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वसई : 32 कोटींसाठी उद्योगपतीच्या हत्येचा कट

point

थेट गाठून गोळ्या झाडल्या, पण...

vasai businessman murder conspiracy, प्रवीण नलावडे  : वसईमध्ये 32 कोटी रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी उद्योगपतीच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह सात आरोपींना अटक केली आहे. वसईतील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील जी.एस.एम. फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांच्यावर 24 जुलै रोजी कंपनीबाहेर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : ‘मला तर शिव्या दिल्या पण माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा.., आपल्या मुली अशी भाषा कशी बोलू शकतात?’, PM मोदींचा नवा Insta Reel

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या भागिदाराने रचला कट 

पोलिस तपासात या संपूर्ण कटामागे कंपनीतीलच भागीदार सागर गिरीश भानुशाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या भानुशालीने आर्थिक फायद्यासाठी हा कट रचला होता. मोहनसिंह परमार यांच्याकडून त्याला सुमारे 32 कोटी रुपयांचे पेमेंट मिळाले होते. परमार यांची हत्या झाल्यास ही रक्कम परत करण्याची जबाबदारी संपुष्टात येईल आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येईल, या उद्देशाने त्याने कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे व्यावसायिक वादातून हा हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं