हिंगोलीतील घटना: फटाके फोडताना अल्पवयीन मुलाला गमवावा लागला डोळा

मुंबई तक

• 04:20 AM • 30 Oct 2021

दिवाळीत फटाके फोडण्याची हौस प्रत्येकालाच असते. बच्चे कंपनीला तर फटाके फोडण्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं. पण, फटाके फोडताना काळजी घेतली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. फटाके फोडणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला आपला एक डोळाच गमवावा लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात ही घटना घडली आहे. 9 वर्षाचा मुलगा […]

Mumbaitak
follow google news

दिवाळीत फटाके फोडण्याची हौस प्रत्येकालाच असते. बच्चे कंपनीला तर फटाके फोडण्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं. पण, फटाके फोडताना काळजी घेतली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. फटाके फोडणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला आपला एक डोळाच गमवावा लागला आहे.

हे वाचलं का?

हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात ही घटना घडली आहे. 9 वर्षाचा मुलगा फटाके फोडत असताना झालेल्या दुर्घटनेत एक डोळाच गमवावा लागला आहे. त्यांच्यावर सध्या हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय झालं?

औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील साईनाथ नामदेव घुगे (वय 9 वर्ष) हा शुक्रवारी अंगणात फटाके फोडत होता. फटाके फोडत असताना अचानक फुटलेला फटाका त्याच्या डोळ्याला लागला. फटका लागल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. घरच्यांनी त्याला उपचारा करिता तत्काळ नांदेड येथे हलवलं. नांदेड येथे योग्य उपचार मिळू न शकल्याने साईनाथला हैद्राबाद येथे उपचाराकरिता हालवण्यात आलं आहे.

    follow whatsapp