Crime: ‘सोन्याचा खजिना सापडलाय’, प्रेयसीला जंगलात नेलं; 35 वेळा भोसकलं

मिथिलेश गुप्ता

05 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:46 AM)

Married Girlfriend Murder: टिटवाळा: लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीची (Girlfriend) धारदार हत्याराने 35 वेळा वार करून निर्घृण हत्या (Murder) करणाऱ्या प्रियकराला (Boy Friend) त्याच्या साथीदारासह कल्याण (Kalyan) तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीशी खोटं बोलून प्रियकराने तिला पुण्याहून टिटवाळ्यात आणलं होतं. जिथे तिची निर्घृण हत्या करण्यात आली. (i found gold treasurei make […]

Mumbaitak
follow google news

Married Girlfriend Murder: टिटवाळा: लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीची (Girlfriend) धारदार हत्याराने 35 वेळा वार करून निर्घृण हत्या (Murder) करणाऱ्या प्रियकराला (Boy Friend) त्याच्या साथीदारासह कल्याण (Kalyan) तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीशी खोटं बोलून प्रियकराने तिला पुण्याहून टिटवाळ्यात आणलं होतं. जिथे तिची निर्घृण हत्या करण्यात आली. (i found gold treasurei make you a jewel boyfriend brutally killed his girlfriend by taking her to forest)

हे वाचलं का?

दरम्यान याप्रकरणी आरोपी जयराम उत्तरेश्वर चौरे या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तर सुरज गोलू धाटे असे हत्येत सहभागी असलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव असून दोघेही बीड जिल्हाचे रहिवाशी आहे. तर रुपांजली संभाजी जाधव असे मृत प्रेयसीचे नाव आहे.

12 डिसेंबरला रुपांजली हिची हत्या झाली होती. 25 डिसेंबर रोजी टिटवाळा येथील गोवेली जंगल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करण्यात आले होते. महिलेचे निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृत्यदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता.

मुंबई : प्रेयसी गावी जाऊन नये म्हणून त्याने घेतला ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव

तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की महिलेची हत्या 12 डिसेंबर रोजी झाली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी 302, 201, 34 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप शिंगटे, पोलिस हवालदार दर्शन सावळे, इरफान सय्यद, पोलिस नाईक राहुल बागूल, पोलिस कॉन्स्टेबल योगेश वाघेरे यांनी गंभीर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध तात्काळ सुरु केला.

दुसरीकडे मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधारकार्डवरून मृतदेहाची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी इंस्टाग्रामद्वारे मृत महिलेचे मित्र व नातेवाईक यांची माहिती पोलीस पथकाने प्राप्त केली. याचदरम्यान, आरोपी जयरामसोबत मृत महिलाचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याचा कौशल्यपूर्ण तपास सुरु केला. विशेष म्हणजे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक चाकण, पुणे व बीड या ठिकाणी गेलं होतं. अखेर पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं.

कल्याण: वासनांध प्रियकर-प्रेयसी, अल्पवयीन भाऊ-बहिणीवर प्रियकर-प्रेयसीकडून वारंवार बलात्कार

विवाहित प्रेयसीची का केली हत्या?

मृत रुपांजली ही पुण्यात आपल्या पती व तीन मुलासह राहत होती. त्यातच आरोपीही पुण्यात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. त्यानंतर आरोपी जयराम आणि मृत महिलेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण होऊन शारीरिक संबध प्रस्थापित झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून प्रेयसी रुपांजलीने जयरामकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे प्रियकराने त्याचा मित्र सूरजशी संगनमत करून प्रेयसीच्या हत्येचा पुण्यातच कट रचला.

या हत्येसाठी त्यांनी उल्हासनगर येथून दोन चाकू देखील खरेदी केले होते. आरोपी प्रियकराने कट रचल्याप्रमाणे मृतक प्रेयसीला काही वर्षापूर्वी मला जंगलात सोने सापडले असून तुही माझ्या सोबत चल, तुला दागिने घेऊन देतो म्हणून तिला बहाण्याने पुण्यातून कल्याण ग्रामीण भागातील जंगलात आणले.

जंगलात आणल्यानंतर जयरामने रुपांजलीवर धारदार हत्याराने तब्बल 35 वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर कल्याण तालुक्यातील गोवली जंगलात तिचा मृतदेह सोडून दोन्ही आरोपींनी पळ काढला होता. अखेर दोन्ही आरोपींना अटक करुन पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला.

    follow whatsapp