लसीकरणाला जाण्यापूर्वी ब्लड टेस्ट करावी का?

मुंबई तक

• 04:30 PM • 01 Apr 2021

हर्षदा परब: लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस दयायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील सुमारे 2 कोटी 97 लाख व्यक्ती आहेत. ज्यांचं येत्या काही दिवसांमध्ये लसीकरण होणं अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून काही डॉक्टरांकडून लसीकरणा आधी ब्लड टेस्ट करण्याचं डॉक्टर सुचवत आहेत. पण लसीकरणाआधी खरंच काही तपासण्या करणं आवश्यक आवश्यक […]

Mumbaitak
follow google news

हर्षदा परब: लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस दयायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील सुमारे 2 कोटी 97 लाख व्यक्ती आहेत. ज्यांचं येत्या काही दिवसांमध्ये लसीकरण होणं अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून काही डॉक्टरांकडून लसीकरणा आधी ब्लड टेस्ट करण्याचं डॉक्टर सुचवत आहेत. पण लसीकरणाआधी खरंच काही तपासण्या करणं आवश्यक आवश्यक नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

कोव्हिडची लस घेतल्यानंतर लोकांचा मृत्यू झाल्याच्या, काहींना कोरोना झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पुन्हा एकदा लोकांमध्ये कोव्हिडच्या लसीबाबत शंका निर्माण होऊ लागली. आता काही ठिकाणी डॉक्टर लसीकरणासाठी जाण्यापूर्वी अण्टीबॉडीसाठी ब्लड टेस्ट करण्याच्या सुचना रुग्णांना देतात. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी लसीकरणाला जाताना अण्टीबॉडी टेस्ट करण्याची काहीच आवश्यकता नसल्याचं सांगितलं. “लस घेतल्यानंतर जर कोणाला कोरोना झाला तर तो गंभीर स्वरुपाचा नसतो. जे कोणी रक्त पातळ होण्यासाठी काही औषधं किंवा इंजेक्शन घेत असतील तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा” डॉ. उत्तुरे म्हणाले.

यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असलेले राहुल पंडीत यांनी लसीकरणापूर्वी कोणतीही टेस्ट करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलंय. डॉ. राहुल पंडीत यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं की “हे चूक आहे. लसीकरणाला जाण्यापूर्वी कोणालाच कोणतीच चाचणी करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर लसीकरणानंतर दुसरा डोस घेण्यापूर्वीदेखील अशाप्रकारे कोणत्याही चाचणीची आवश्यकता नाही” असं डॉ. राहुल पंडित यांनी मुंबई तकला सांगितलं.

महाराष्ट्र राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. डी. एन. पाटील यांनी देखील लसीकरणाला जाण्यापूर्वी कोणत्याही चाचणीची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. “केंद्रीय आरोग्य खात्याने किंवा राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणापूर्वी चाचण्या कराव्यात अशा कोणत्याही सुचना दिलेल्या नाहीत. तसंच अशा प्रकारे डॉक्टर लसीकरणापूर्वी टेस्ट करायला सांगत असल्याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तशी तक्रार आल्यास आम्ही त्याबाबत योग्य ती कारवाई करू,” असं डॉ. पाटील यांनी सांगितले.

    follow whatsapp