Rohit Pawar : पवारांनी व्हिडिओ शेअर केलेल्या PDCC बँकेवर गुन्हा

प्रशांत गोमाणे

07 May 2024 (अपडेटेड: 07 May 2024, 10:30 PM)

Rohit Pawar, PDCC Bank : वेल्हेत पीडीसीसी बँकेची शाखा आहे. ही शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. पैशाचे वाटप करता यावे यासाठी ही बँक उशीरापर्यंत सुरु ठेवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यासह रोहित पवारांनी बँकेचा व्हिडिओ देखील एक्सवर शेअर करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

 case file against pdcc bank and manager after rohit pawar allegation election commission baramati lok sabha election 2024

पुणे जिल्हा सहकारी बँक अर्थात पीडीसीसी (PDCC) बँकेवर आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

follow google news

Rohit Pawar, PDCC Bank : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसै वाटप केल्याचा आरोप केला होता.या संबंधित पुरावे देखील रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओची आता निवडणूक आयोगाने (Election commission) दखल घेऊन पुणे जिल्हा सहकारी बँक अर्थात पीडीसीसी (PDCC) बँकेवर आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने  बारामतीत खळबळ माजली आहे. (case file against pdcc bank and manager after rohit pawar allegation election commission baramati lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

वेल्हेत पीडीसीसी बँकेची शाखा आहे. ही शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. पैशाचे वाटप करता यावे यासाठी ही बँक उशीरापर्यंत सुरु ठेवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यासह रोहित पवारांनी बँकेचा व्हिडिओ देखील एक्सवर शेअर करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची आता निवडणूक आयोगाने दखल घेऊन कारवाई केली आहे. 

हे ही वाचा : ठाकरेंचं प्लॅनिंग.. पण मी काय थांबलो असतो का?: CM शिंदे

रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याच सांगत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पीडीसीसी बँकेवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रात्री पीडीसीसी बँकेत 40 ते  50 लोक संशयतरीत्या बँकेत फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरारी पथकाच्या तपासात स्पष्ट झालं. त्यामुळे या प्रकरणी बँक मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपावर अजित पवार काय म्हणाले? 

अजित पवार माध्यमांशी बोलत होते. रोहित पवारची सोशल मीडियावर उत्तम टीम आहे. सोशल मीडियामध्ये त्याला फार इटरेंस्ट आहे. अलिकडच्या काळातला तो असल्याने त्याला सोशल मीडियाचा वापर कळतो. तसेच सोशल मीडियावर तो इतका पोहोचलेला आहे की तो वेगळ काही दाखवून हे कालच आणि पर्वाचचं आहे. हे दाखवायलाही कमी करणार नाही. त्यामुळे त्याला काही उद्योग नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

हे ही वाचा :'BJP हा फुटलेला पक्ष नाही मात्र शिवसेना..', CM शिंदेंचं मोठं विधान

रोहित पवारांनी बँकेतून पैसे वाटप केल्याचाही आरोप केला होता. या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तो जो आरोप करतो, त्याप्रमाणे बँकेत सीसीटीव्ही कँमेरे असतात. त्यामुळे बँकेचे सीसीटीव्ही तपासावेत. बँक तेव्हा उघडी होती का? कोण त्या बँकेत आलं होतं आणि बँकेत काय घडलं? हे स्पष्ट होईल. 
 

    follow whatsapp