ADVERTISEMENT
Meera - Bhayandar Election : मीरा-भाईंदर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर शहराची शासकीय संस्था आहे. या महापालिकेची स्थापना ही 2002 मध्ये झाली होती. या महापालिका शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि पोलिस कार्यांचे व्यवस्थापन करते. तसेच या महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल हा 2017 मध्ये झाला, ज्यात 95 जागांसाठी मतदान केलं होतं. पक्षनिहाय निकाल हा खालीलप्रमाणे आहेत...
हे ही वाचा : नागपुरात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, उमेदवारी न दिल्याने थेट ऑफिस फोडलं
मीरा-भाईंदर महानगरपालिका 2017 निकाल
पक्ष जिंकलेल्या जागा
भारतीय जनता पक्ष 61
शिवसेना 22
काँग्रेस 10
अपक्ष 2
एकूण 95
मीरा भाईंदर महापालिकेनं 2017 मध्ये सर्वाधिक भाजपने 61 जागांवर विजय मिळवला होता. तर दोन नंबरचा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते.
मीरा-भाईंदर महानगरपालिका एकूण महापौर
मायरा मेंडोंका 27 फेब्रुवारी 2005
निर्मला सावळे 27 ऑगस्ट 2007
नरेंद्र मेहता 27 फेब्रुवारी 2010
तुळशीदास म्हात्रे 27 ऑगस्ट 2012
कॅटलिन परेरा 27 फेब्रुवारी 2015
गीता जैन 27 ऑगस्ट 2017
डिंपल मेहता 27 फेब्रुवारी 2020
ज्योत्स्ना हसनाळे 27 ऑगस्ट 2022
हे ही वाचा : जळगाव महापालिकेवर 2018 च्या निवडणुकीत कमळ फुललं, आता 2025-26 मध्ये काय होणार?
निवडणूक प्रक्रिया सुरू
2025-2026 साठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नामनिर्देशन 27 डिसेंबर 2025 पर्यंत झाले, आणि मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होईल, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहे. यासाठीच ही महापालिका 29 महापालिकांसाठी फारच महत्त्वाची आहे.
ADVERTISEMENT











