मुंबईची खबर : मुंबईकरांनो लक्ष द्या! 1 मार्चपासून बेस्ट (BEST) बस सेवेत मोठे बदल...

मुंबई तक

• 04:23 PM • 28 Feb 2026

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून शुक्रवारी (27 मार्च) मुंबईतील त्यांच्या बऱ्याच बस सेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा करण्यात आली. BEST बस सेवांमधील हे बदल उद्या म्हणजेच 1 मार्च 2026 पासून लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

1 मार्चपासून बेस्ट (BEST) बस सेवेत मोठे बदल!

1 मार्चपासून बेस्ट (BEST) बस सेवेत मोठे बदल!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

point

1 मार्चपासून बेस्ट (BEST) बस सेवेत मोठे बदल...

Mumbai News: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून शुक्रवारी (27 मार्च) मुंबईतील त्यांच्या बऱ्याच बस सेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा करण्यात आली. BEST बस सेवांमधील हे बदल उद्या म्हणजेच 1 मार्च 2026 पासून लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बदलांमध्ये रूट डायव्हर्जन, शॉर्ट टर्मिनेशन आणि बऱ्याच मार्गांचं एसी बस सेवेत रूपांतर करणे यांचा समावेश आहे. 'बेस्ट'च्या माहितीनुसार, संचालन क्षमता वाढवणे, वर्दळ कमी करणे आणि प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान करणे हाच या बदलांचा उद्देश आहे. 

हे वाचलं का?

BEST बस सेवेतील मार्गांमध्ये बदल   

रूट A-1 

सीएसमएमटी (CSMT) ते सांताक्रूझ डेपो दरम्यान चालणारी  A-1 बस आता वांद्रे रिक्लेमेशन बस स्थानक आणि वांद्रे बस स्थानक (पश्चिम) कडून न जाता ही सेवा आता स्वामी विवेकानंद रोडमार्गे माहिम कोळीवाडा ते वांद्रे सिनेमा पर्यंत धावेल. 

रूट  A-6

बॅकबे डेपो ते टाटा पॉवर स्टेशन पर्यंत जाणारी ए-6 बस आता डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते बॅकबे डेपो पर्यंत धावणार नाही. ही सेवा आता कुलाबा डेपो/ इलेक्ट्रिक हाऊस पर्यंत असेल. 

रूट A-22

विजय वल्लभ चौक ते मजास डेपो पर्यंत धावणारी ए-22 बस आता जिजामाता उद्याना पासून मजास डेपो पर्यंत धावेल.

रूट 69 

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते वडाळा डेपोपर्यंत धावणारा रूट नंबर 69 आता प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) पर्यंतच असेल.

रूट A-101 चा विस्तार 

वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी पर्यंत धावणारी A-101 बस आता महात्मा फुले मंडई पर्यंत धावेल. 

रूट 411 चं डायव्हर्जन 

वडाळा डेपो ते संघर्ष नगर (चांदिवली) हा मार्ग क्रमांक 411 आता संत कबीर (60 फूट) रोडऐवजी 90 फूट रोड आणि संत रोहिदास मार्गाने धावेल.

रूट A-415

आगरकर चौक (अंधेरी पूर्व) ते SEEPZ गावाकडे धावणारी A-415 बस आता SEEPZ बस स्थानकापर्यंत धावेल. 

हे ही वाचा: "राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा",वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट

एसी बस सेवेच्या मार्गात बदल 

A-103: आर.सी. चर्च - कमला नेहरू पार्क
A-224: शास्त्री नगर - बोरिवली बस स्थानक (पश्चिम)
A-235: अंधेरी स्टेशन (पश्चिम) मिल्लत नगर मार्गे
A-248: अंधेरी स्टेशन (पश्चिम) - रमेश नगर
A-254: अंधेरी स्टेशन (पश्चिम) - वीरा देसाई रोड (एक्सटेंडेड)
A-361: माहुल गाव - कुर्ला बस स्थानक (पूर्व)
A-492: माजेस डेपो - भूमी एकर्स (ठाणे)