Dombivali News : डोंबिवलीतून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे निधन झाल्याची घटना आहे. उपनिरीक्षक विजय सांगडे (वय 57) अशी त्यांची ओळख समोर आली. ठाण्यात ड्युटीवर असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. ड्युटीवर असताना त्यांना अचानक चक्कर येऊ लागली आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर शोकाकुल झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वाशिम: गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला अश्लील व्हिडिओचा QR स्कॅनर, तिघांनी दिली कबुली
एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत असलेल्या पोलिसांचं निधन
विजय सांगडे हे गेली तीन वर्षे एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते. सकाळी नेहमीप्रमाणे ते ड्युटीसाठी जाताना त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला, दरवाजा लावून घ्या, मी येतो म्हणत ते गेले, त्यानंतर ते परतलेच नाहीत. ठाण्यात ड्युटीदरम्यान त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागले आणि त्यांना चक्कर येऊ लागली. त्यानंतर त्यांना तातडीने जय आनंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपाचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब पोरके झाले.
डोंबिविलीतील मानपाडा परिसर शोकाकुल
सांगडे यांचे पार्थिव डोंबिविलीतील मानपाडा मंदिराजवळील शिव मल्हार आर्केड येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. पार्थिव घरी पोहोचेपर्यंत नातेवाईक, मित्रमंडळी आणि इमारतीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेनं परिसरात शोककळी पसरली होती. सांगडे हे मूळचे जुन्नर येथील असून त्यांचे पार्थीव डोंबिवलीतून जुन्नर येथे अंत्यदर्शनासाठी नेण्यात येणार आहे.
हे ही वाचा : पुणे: देहूगावात आयटी इंजीनियरने 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला संपवलं, स्वत:ने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
सांगडे यांचा मोठा मुलगा हा सिक्युरीटी फोर्समध्ये कार्यरत असून लहान मुलगा हा पोलीस अकॅडमी चालवतोय. वडिलांच्या निधनाने दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT












