Crime News : मधुचंद्राची रात्र म्हणजे नवरा आणि बायकोच्या नव्या आयुष्याची एक गोड सुरुवात. मात्र याच रात्री एका नवऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मधुचंद्राच्या रात्री एका नववधूने आपल्या पतीवर चाकूने हल्ला करुन जखमी केले आणि त्यानंतर घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. धक्कादायक म्हणजे, हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा काकाच आहे. या घटनेमुळे पिरसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चेंबूरमध्ये इमारतीचं बांधकाम सुरु असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार कोसळले, एकाचा करुण अंत
'मी मरेन नाहीतर तुला मारेन'
21 फेब्रुवारी रोजी या जोडप्याचा विवाह झाला होता. 22 फेब्रुवारीला नवरी आपल्या सासरी पोहोचली. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा पती तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा तिने त्याला स्पर्श करण्यास मनाई केली. पतीने अधिक प्रयत्न केला असता, तिने रागाच्या भरात 'एक तर मी मरेन किंवा तुला मारीन' अशी धमकी दिली आणि चाकूने पतीच्या हातावर वार केला.
कुटुंबियांना दिले गुंगीचे औषध
पीडित पतीने सांगितले की, 'चाकूच्या हल्ल्यानंतर मी घाबरलो होतो आणि दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरच्यांना बोलावून घेतले. त्यांनी तिची समजूत काढली, पण तिचा हेतू वेगळाच होता. तिसऱ्या दिवशी रात्री तिने जेवणात गुंगीचे औषध मिसळून संपूर्ण कुटुंबाला बेशुद्ध केले. आम्ही सर्वजण बेशुद्ध असताना ती घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली.'
हे ही वाचा : पुणे : अमेरिकेत शिकलेल्या अन् तगड्या पगाराच्या मुलाशी लग्न, पण 3 महिन्यातच तरुणीने इमारतीवरुन उडी मारून जीव दिला
काकासोबत होते प्रेमसंबंध
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे की, संबंधित नववधूचे तिच्याच नात्याने काका लागणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. घरातून पळाल्यानंतर ती त्याच काकासोबत गेल्याचे समजते. पीडित पतीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आरोपी महिलेचा आणि तिच्या काकाचा शोध सुरु केला आहे. नवरीने घरातून नेमकी किती रोकड चोरली, याचा पोलीस पंचनामा करत आहेत.
ADVERTISEMENT











