Crime News : दिल्लीच्या मुखर्जीनगर पोलीस ठाणे सेनापत परिसरात नर्ससोबत कथितरित्या लैंगिक अत्याचार केला. संबंधित प्रकरणात आरोपीला शनिवारी अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. आरोपीची डॉक्टर मोहित अशी ओळख समोर आली. संबंधित प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डॉक्टरांचा पत्नीसोबत वाद, भुलीच्या औषधाचा ओव्हरडोस घेत संपवलं जीवन
रुग्णालयात डॉक्टरची पीडितेशी भेट
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी सेमिनारमध्ये सामील होण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत दिल्लीला घेऊन आले होते, अशातच सोनीपत येथील एका रुग्णालयात पीडित नर्स कार्यरत होती. याच रुग्णालयात डॉक्टर काही महिन्यांपासून सेवा देण्यासाठी जात होता. त्यानंतर डॉक्टरची पीडितेशी भेट झाली होती.
कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून पीडित नर्सवर अत्याचार
पीडितेनुसार, आरोपी डॉक्टरांनी तिला दिल्लीत आयोजित सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी तिला सांगितले होते. 18 ऑगस्ट रोजी तो तिला बाईकवरून पंजाबी बाग येथे घेऊन गेला. एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना आरोपीने तिच्या कोल्ड्रिंकमध्ये काही मादक पदार्थ मिसळला होता. थंड प्येय प्यायल्यानंतर ती अर्धवट बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेला त्याच्या बाईकवरून इंदिरा विकास कॉलनीतील त्याच्या फ्लॅटवर नेण्यात आले होते. जिथे त्याने पीडित नर्सवर अत्याचार केला.
हे ही वाचा : मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह
पोलिसांच्या तपासानंतर माहिती समोर आली की, आरोपी हा युक्रेनियन कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण करून भारतात परतल्यानंतर डॉ. मोहित दिल्लीतीलल विविध रुग्णालयांशी संबंधित होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडितेचा जबाब सोमवारी न्यायाधीशांसमोर नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT












