Crime News : मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टरच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण पोलिसांनीच उलगडले आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आणि प्रथमिक तपासादरम्यान पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की, 42 वर्षीय मूत्ररोग तज्ज्ञाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. हा प्रकार वाराणसीच्या रोहनिया पोलीस ठाणे हद्दीतील हेरिटेज मेडिकल कॉलेजमधील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची मोठी घोषणा
डॉक्टरांनी भुलीच्या औषधाचा ओव्हरडोस घेत संपवलं जीवन
मृत डॉक्टरांनी डॉ. गौतम शुभंकर (वय 42) अशी ओळख समोर आली. डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी वाराणसीच्या रोहनिया पोलीस ठाणे परिसरातील भडवार येथील हेरिटेज मेडिकल कॉलेजमध्ये खोली क्रमांक 802 मध्ये भूल देण्याच्या औषधाचा ओव्हरडोस देत जीवन संपवलं होतं. ते गेल्या काही महिन्यांपासून नैराशाचे जीवन जगत होते. त्यांच्यात आणि पत्नीत मतभेद निर्माण झाले होते. शनिवारी सायंकाळी दरवाजा तोडल्यानंतर आत मृतदेह, एक सिरिंज आणि भूल देण्याच्या औषधाची एक रिकामी बाटली आढळून आली होती.
हे ही वाचा : बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा शुभमुहूर्त कधी? संपूर्ण माहिती वाचा
डॉक्टरांचा मृतदेह पलंगावर
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा डॉक्टरने फोनला उत्तर दिले नाही, तेव्हा त्यांचे सहकारी डॉक्टर त्यांच्या खोलीत गेले. खोलीला आतून कुलूप लावले होते आणि त्यांचा मोबाइल फोन बंद होता. पोलिसांनी ताबडतोब दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, डॉक्टरांचा मृतदेह पलंगावर आढळून आला होता. या प्रकरणात प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनची न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली होती.
ADVERTISEMENT












