मुंबई : मॉलमधील सेल्सगर्लला जबरदस्तीने किस केलं, आता न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई तक

14 Sep 2026 (अपडेटेड: 14 Sep 2026, 03:30 PM)

Mumbai Crime News : मुंबईतील एका मॉलमध्ये महिला सेल्सगर्लला जबरदस्तीने किस केल्याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित महिलेचा जबाब आणि साक्षीदारांचे पुरावे विश्वासार्ह असल्याचे सांगत न्यायालयाने आरोपीचे कृत्य जाणीवपूर्वक असल्याचे नमूद केले.

Mumbai Crime News

Mumbai Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : मॉलमधील सेल्सगर्लला जबरदस्तीने किस केलं,

point

आरोपीला 1 वर्षाचा तुरुंगवास

Mumbai Crime News : मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने मॉलमध्ये काम करणाऱ्या महिला सेल्सगर्लला जबरदस्तीने किस केल्याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रितेश राजूभाई अरमुळ्ला असे आरोपीचे नाव असून तो बोरीवली पश्चिमेतील बोरभाटपाडा परिसरातील रहिवासी आहे. महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. यापूर्वी आरोपी आणि पीडित महिला एकमेकांना ओळखत नव्हते. त्यामुळे महिलेने आरोपीला खोट्या प्रकरणात गोवण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे : IT कर्मचाऱ्याला कारने चिरडलं, FIR मध्ये आरोपीचं नाव नाही? नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेने गेल्यावर्षी 17 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. ती बोरीवली पश्चिमेतील शिंपोली परिसरातील एका मॉलमध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. तक्रारीनुसार, सायंकाळी सुमारे 6 वाजता ती ड्युटीवर असताना तिने थंड पेय घेतले आणि बिलिंग काउंटरकडे जात होती. त्यावेळी गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि त्याने वॉशरूम कुठे आहे, अशी विचारणा केली. महिलेने त्याला वॉशरूमची दिशा दाखवली. मात्र, त्याने तिला पुन्हा पुन्हा वॉशरूम दाखवण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. त्यावर महिलेने त्याला पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून गेला.

हेही वाचा : पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

महिलेला जबरदस्तीने किस केल्याचा आरोप

काही वेळाने तो व्यक्ती पुन्हा परत आला आणि त्याने अचानक महिलेला जबरदस्तीने किस केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी दोघेही जमिनीवर पडले. त्यानंतरही त्याने महिलेला किस करणे सुरू ठेवल्याचे तिने सांगितले. या प्रकारामुळे परिसरातील लोकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. जवळच्या लोकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि पोलिसांना फोन केला. न्यायालयासमोर साक्षीदारांनी आरोपी महिलेच्या मागे वॉशरूमच्या दिशेने गेला होता आणि महिलेचा त्याच्या हेतूची कल्पना नसल्याचा फायदा त्याने घेतल्याचे सांगितले. आरोपीने महिलेला किस केल्यानंतर ती खाली पडली आणि त्यानंतर त्याने पुन्हा तिला किस केल्याचेही साक्षीदारांनी सांगितले.

न्यायालयाने सुनावली एका वर्षाची शिक्षा

न्यायालयाने पीडित महिलेचा जबाब आणि साक्षीदारांचे पुरावे विश्वासार्ह असल्याचे म्हटले. आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे तसेच साक्षीदारांच्या जबाबामुळे या पुराव्यांवर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हा प्रकार चुकून घडला असण्याची शक्यताही न्यायालयाने फेटाळून लावली. एखादी व्यक्ती घसरून दुसऱ्या व्यक्तीवर पडली, तरी त्यानंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया किस घेण्याची नसते, असे न्यायालयाने नमूद केले.  घटनाक्रमावरून त्याने हे कृत्य जाणीवपूर्वक आणि माहिती असून केल्याचे न्यायालयाने म्हटले.