गरोदर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

• 09:11 AM • 14 Sep 2026

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरच्या निर्घृण हत्या प्रकरणात चंदीगड पोलिसांनी पहिली अटक केली आहे. आरोपी, परमिंदर सिंग उर्फ ​​पिंडा याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संपूर्ण बातमी वाचा.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गरोदर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जिवंत जाळलं

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर हिच्या मृत्यूनंतर सुमारे दोन आठवड्यांनी चंदीगड पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी मंगळवारी (8 सप्टेंबर) उशिरा रात्री परमिंदर सिंग उर्फ पिंडा याला ताब्यात घेतले. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान मनजीतच्या कथित अपहाराशी संबंधित कॉल डिटेल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशनच्या तांत्रिक पुराव्यांवरून घटनास्थळाजवळ परमिंदरची उपस्थिती स्पष्ट झाली. चौकशीत त्याने अपहारातील आपला सहभाग मान्य केला असला तरी तिला पेटवून दिल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.

हे वाचलं का?

झाडाला बांधून लावली आग?

प्राथमिक तपासानुसार, 3 आणि 4 जुलैच्या दरम्यानच्या रात्री मनजीतला तिच्या ओळखीच्या लोकांनी सेक्टर 34 येथे बोलावले होते. तेथे तिच्यावर हल्ला करून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून नेण्यात आले. त्यानंतर तिला पंजाबमधील मोरंडाजवळील जंगलात नेऊन एका झाडाला बांधून आग लावल्याचा आरोप आहे. काही वेळाने तिच्या एका परिचिताने तेथे पोहोचून ब्लँकेटच्या साहाय्याने आग विझवली. त्यानंतर तिला आधी मोरंडा येथील रुग्णालयात, नंतर मोहालीतील खासगी रुग्णालयात आणि अखेर चंदीगडच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. तेथे सुमारे दीड महिना उपचारादरम्यान 26 ऑगस्ट रोजी मनजीत कौरचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, गणेशोत्सवासाठी गावी जाताय? 'हा' पास असल्यास मिळणार टोलमाफी

सात आडवड्यांची गरोदर

तपासात उघड झाले की, मृत्यूसमयी मनजीत सुमारे सात आठवड्यांची गरोदर होती, त्यामुळे पोलिस या प्रकरणाकडे 'दुहेरी हत्या' म्हणून पाहत आहेत. परमिंदरने पोलिसांना सांगितले की, मनजीतने गर्भातील मूल त्याचे असल्याचे म्हटले होते, परंतु त्याने हा दावा फेटाळला आहे. त्यामुळे गर्भधारणेवरून झालेला विवाद हे हत्येचे संभाव्य कारण असू शकते, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. मनजीतच्या आईने आधीच परमिंदर सिंग आणि रिंकू नावाच्या अन्य एका परिचितावर संशय व्यक्त केला होता, ज्यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच, तपासाची दिशा भरकटवण्यासाठी सोशल मीडियावरील जुन्या वादाचा वापर केला गेला का, याचाही शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवला, राज ठाकरे संतापले, मोदी-शाहांवर हल्लाबोल

नेमकं काय घडलं?

चौकशीदरम्यान परमिंदरने घटनेबाबत वेगळा दावा केला आहे. त्याच्यानुसार, मनजीतला मोरंडाच्या जंगलात नेण्यात आले नव्हते, तर सेक्टर 34 मधील एका पार्कमगे रिंकूसोबत झालेल्या वादानंतर तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी आग विझवून तिला खरड येथील एका फ्लॅटवर नेले होते. सध्या पोलिस परमिंदरच्या या दाव्यांची आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करत आहेत. या प्रकरणात अटक झालेला तो पहिलाच आरोपी असल्याने मनजीतला नेमके कुठे नेण्यात आले, तिच्यावर कुठे हल्ला झाला आणि आग कोणी लावली, या मुख्य प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिस पुढील तपास करत आहेत.