बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह, नवरा अन् 6 महिन्यांचं बाळ गायब; धक्कादायक हत्याकांड!

पंकजा मुंडे

13 Sep 2026 (अपडेटेड: 13 Sep 2026, 12:26 PM)

दिल्लीत प्रेमप्रकरणातून एका महिलेची निर्घृण हत्या झाली आहे. एका भाड्याच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह

point

नवरा अन् 6 महिन्यांचं बाळ गायब

point

धक्कादायक हत्याकांड!

Crime News : नवी दिल्लीतील एका धक्कादायक हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी पती आणि त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तब्बल 300 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि जवळपास 1,200 किलोमीटरचा पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्या एका नातेवाईकालाही पोलिसांनी गजाआड केले आहे.

हे वाचलं का?

बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह

ही घटना 29 ऑगस्ट रोजी उघडकीस आली, जेव्हा पोलिसांना एका भाड्याच्या खोलीतील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, सबिला खातून असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तिचा पती झाहिद आणि त्यांचे सहा महिन्यांचे बाळ घटनास्थळावरून गायब होते. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाचे चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीसह 3 मुलींना संपवलं, भयंकर हत्याकांड

दुसऱ्या महिलेसोबत दिसला पती

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, पती झाहिद एका दुसऱ्या महिलेसोबत दिसला. त्या महिलेची ओळख रुखसार खातून अशी पटली आणि झाहिद व रुखसार यांच्यात जवळचे संबंध असल्याचे समोर आले. अधिक तपासात पोलिसांनी झाहिदच्या एका नातेवाईकाला नोएडामधून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान नातेवाईकाने कबूल केले की, सबिलाची हत्या केल्यानंतर झाहिद आणि रुखसार त्याच्याकडे आले होते, जिथे त्याने त्यांना लपण्यास मदत केली आणि नंतर बिहारच्या सीतामढी येथे पळून जाण्यास सहकार्य केले.

हे ही वाचा : कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं? सरकारने कशी बदलली रणनीती?

प्रेमसंबंधांतून काढला काटा

ओसामाला मदत केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांनी बिहारमध्ये मोहीम राबवून झाहिद आणि रुखसार या दोघांनाही ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत झाहिद आणि रुखसार यांना एकमेकांशी लग्न करायचे होते, मात्र त्यांच्या या प्रेमसंबंधांची भणक सबिलाला लागली होती. यामुळे दोघांनी मिळून सबिलाचा काटा काढण्याचा कट रचला आणि तिची हत्या करून बाळासह पळ काढला. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.