बारामतीत गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून, गुप्तांगावर जखमा

मुंबई तक

• 06:42 PM • 14 Sep 2026

Baramati Crime News : बारामतीच्या पणदरे एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची दुर्घटना आहे.

Baramati crime (AI Photo)

Baramati crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मृत महिलेवर लैंगिक अत्याचार

point

आरोपीने हातोड्याने हल्ला करत केला खून

point

गुप्तांगावर आढळल्या जखमा

Baramati Crime News : वसंत मोरे - बारामतीच्या पणदरे एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची दुर्घटना आहे. संबंधित प्रकरणात आरोपीची गणेश रामचंद्र माने (वय 26) अशी ओळख समोर आली. या घटनेने परिसर हादरून गेला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार, FIR दाखल

मृत महिला गर्भवती

या प्रकरणात नराधम आरोपीने महिलेच्या अंगावरील दागिने देखील घेतले होते. शवविच्छेदन अहवालात मृत महिला ही गर्भवती असल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पिढीतेच्या सासूने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करत आरोपींनी खुनाचा गुन्हा दाखल केला. 12 सप्टेंबर रोजी पीडितेचा पती तानाजी रडत असायची माहिती शेजाऱ्यांनी तानाजीच्या आईला दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

त्यानंतर सासूने घर गाठले असता घरात सून मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ आले असता, तपास केला. या तपासादरम्यान आरोपी गणेश मानेबाबत घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने घटनेचा कबुलीनाम दिला.

गुप्तांगावर आढळल्या जखमा

महिलेवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला, नंतर तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात महिलेच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. आरोपीकडून हातोडा, कपडे व दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा : MBBS डॉक्टरकडून सेमिनारच्या बहाण्याने नर्सवर केले अत्याचार

 

जबरदस्तीने शारीरिकसंबंध

आरोपीने वैशालीला अगोदर हातोड्याने मारून जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेतच तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.