"राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा",वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट

Walmik Karad son Sushil Karad Facebook Post : संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख यांनी “नेमका राजाश्रय कोणाचा आहे, हे स्पष्ट करावे,” अशी मागणी करत केलेल्या वक्तव्यानंतर आज अवघ्या काही मिनिटांपूर्वी ही पोस्ट समोर आल्याने चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

Walmik Karad son Sushil Karad Facebook Post :

Walmik Karad son Sushil Karad Facebook Post :

मुंबई तक

28 Feb 2026 (अपडेटेड: 28 Feb 2026, 03:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा"

point

वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट

Walmik Karad son Sushil Karad Facebook Post,  रोहिदास हातागळे/बीड :  मस्साजोगचे माजी सरपंच आणि दिवंगत नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील कराड याची फेसबुक पोस्ट शुक्रवारी (दि.28) तुफान व्हायरल झाली होती. दिवसभर पहिल्या पोस्टची चर्चा रंगलेली असताना आता त्याने आणखी एक खळबळ उडवून देणारी पोस्ट केली आहे. “राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा” अशा शब्दांत त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.  

हे वाचलं का?

हेही वाचा : जुन्या विचारांच्या वडिलांची हत्या, पोटच्या दोन मुलींनीच घेतला जीव; कसं होतं बाप-लेकींचं नातं?

धनंजय देशमुखांना वाल्मिक कराडच्या मुलाकडून प्रत्युत्तर?

या पोस्टमधील ‘राजआश्रय’ या शब्दावरून सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे कालच दिवंगत संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख यांनी “नेमका राजाश्रय कोणाचा आहे, हे स्पष्ट करावे,” अशी मागणी करत केलेल्या वक्तव्यानंतर आज अवघ्या काही मिनिटांपूर्वी ही पोस्ट समोर आल्याने चर्चेला अधिकच उधाण आले आहे. ही पोस्ट नेमकी धनंजय देशमुख यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सुशील कराडची जुनी पोस्ट काय होती ?

दरम्यान, या सततच्या फेसबुक पोस्टमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर सुशील कराड अधिकृत भूमिका कधी स्पष्ट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील या पोस्ट्समुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याने शुक्रवारी देखील एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने लिहिलं की, "आत्ता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार.."

इतर महत्त्वाच्या बातम्या 

23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

    follow whatsapp