'धनंजय मुंडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...', मनोज जरांगे आणि सुरेश धस यांना कोणी दिली धमकी?

Dhananjay Munde supporter threatened Manoj Jarange Patil and Suresh Dhas : जरांगे यांच्या या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, "धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास."

Dhananjay Munde supporter threatened Manoj Jarange Patil and Suresh Dhas

Dhananjay Munde supporter threatened Manoj Jarange Patil and Suresh Dhas

मुंबई तक

28 Feb 2026 (अपडेटेड: 28 Feb 2026, 04:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'धनंजय मुंडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...'

point

मनोज जरांगे आणि सुरेश धस यांना कोणी दिली धमकी?

Dhananjay Munde supporter threatened Manoj Jarange Patil and Suresh Dhas ,बीड : बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीतील समर्थक गोविंद फड यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली असून, यामध्ये त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. "धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर खेळ खल्लास..मनोज जरांगे आणि सुरेश धस," अशा आशयाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

वादाची ठिणगी आणि पार्श्वभूमी

या वादाची मुळे बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले होते, तर वाल्मीक कराड यांना तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांनी सातत्याने आग्रही भूमिका मांडली होती.

हेही वाचा : "राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा",वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. "माझ्या हत्येचा कट रचला जात असून, धनंजय मुंडे वारंवार माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. मंत्रालयात यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मुंडे यांनी हे थांबवावे, अन्यथा त्यांना हे जड जाईल," असा इशारा जरांगे यांनी दिला होता.

फेसबुक पोस्टने वाढवला तणाव

जरांगे यांच्या या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, "धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास." या पोस्टमुळे मुंडे समर्थक आणि जरांगे-धस समर्थक यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एका बाजूला मुंडे समर्थक आपल्या नेत्याची बाजू सावरून धरत आहेत, तर दुसरीकडे जरांगे आणि धस यांच्या समर्थकांनी या धमकीचा तीव्र निषेध केला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

या फेसबुक पोस्टमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संदर्भ देत जुन्या वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे. मनोज जरांगे यांचे थेट आरोप आणि त्यानंतर मुंडे समर्थकाने दिलेली ही धमकी, यामुळे बीडमधील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक वादाकडे वळताना दिसत आहे. याप्रकरणी आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि यावर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ

    follow whatsapp