Jalgaon महापालिका निकाल: कमळ पुन्हा फुलण्याच्या तयारीत, पाहा निकाल LIVE

मुंबई तक

30 Dec 2025 (अपडेटेड: 16 Jan 2026, 02:10 PM)

Jalgaon Muncipal Corporation : जळगाव महानगरपालिकेची थोडक्यात माहिती, इतिहास आणि अंतिम निवडणूक 2018 निकाल

Jalgaon Muncipal Corporation

Jalgaon Muncipal Corporation

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जळगाव महानगरपालिका थोडक्यात माहिती

point

जळगाव महानगरपालिका अंतिम निकाल 2018

हे वाचलं का?

Jalgaon Municipal Corporation : जळगाव महानगरपालिका ही राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहराची स्थानिक शहरी प्रशासकीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना 21 मार्च 2003 रोजी झाली. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर श्रीमती आशा दिलीप कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला, तर अब्दुल करीम सालार हे पहिले उपमहापौर झाले.

जळगाव महापालिका निकालाचे LIVE अपडेट:

पाहा जळगाव महापालिकेत कोण आघाडीवर (एकूण जागा - 75)

  1. भाजप - 46 आघाडीवर
  2. शिवसेना - 24 आघाडीवर
  3. राष्ट्रवादी काँग्रेस - 1 आघाडीवर
  4. शिवसेना UBT - 1 आघाडीवर
  5. मनसे - 0 आघाडीवर
  6. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 0 आघाडीवर 
  7. काँग्रेस - 0 आघाडीवर
  8. इतर- 0 आघाडीवर
  • जळगावमध्ये मतमोजणीला झाली सुरुवात

हे ही वाचा : लातूर हादरलं! नराधमानं दारू पिऊन अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून केला अत्याचार, नंतर पीडितेला रिक्षात टाकून...

जळगाव महानगरपालिका थोडक्यात माहिती

महानगरपालिकेचे क्षेत्रफळ अंदाजे 68.78 चौरस किलोमीटर आहे आणि 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे 4.60 लाख आहे. या संस्थेचे मुख्यालय हे जळगाव शहरातच असल्याचं सांगण्यात येत आहे. ही संस्था शहरातील नागरी सुविधा, बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य इत्यादी सेवा पुरवते.

या महापालिकेला आता 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यात 17 महापौर आणि विविध विकासकामे झाली आहेत. जळगाव शहराचा इतिहास खानदेश प्रदेशाशी जोडलेला आहे. याच महापालिकेचा 2018 चा अंतिम निकाल जाणून घेऊयात.

अंतिम निकाल (निवडणुकीचे)जळगाव महानगरपालिकेच्या शेवटच्या निवडणुका 2018 मध्ये झाल्या होत्या, ज्यात एकूण 75 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 57 जागा जिंकून आपला विजय मिळवला होता. जळगावात गेली 40 वर्षांपासून शिवसेनेच्या सुरेश जैन यांची याच ठिकाणी सत्ता होती. पण भाजपने आपली ताकद लावून 2018 मध्ये एकहाती विजय मिळवला होता. याच निकालाची एकूण माहिती खालीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : नागपुरात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, उमेदवारी न दिल्याने थेट ऑफिस फोडलं

जळगाव महानगरपालिका अंतिम निकाल 2018

भाजप (BJP): 57 जागा

शिवसेना (Shiv Sena): 15 जागा

AIMIM: 3 जागा

काँग्रेस (Congress): 0 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): 0 जागा