'त्या' निवडणुकीत आमचा पराभव, आम्हाला पुन्हा उमेदवारी द्यावी, मातोश्रीबाहेर 'तो' फोटो अन् रडारड 

BMC Election : उमेदवारीच्या मागणीसाठी इच्छूक उमेदवाराकडून मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात आल्याचं चित्र आता समोर आलं आहे. तसेच न्यायाची मागणी देखील करण्यात आली.

BMC election

BMC election

मुंबई तक

• 01:35 PM • 29 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मातोश्रीबाहेर रडारड 

point

ठाकरेंच्या इच्छूकांकडून तिकीटांची मागणी 

point

निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

BMC Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाची अंतिम तारीख 30 डिसेंबर अशी आहे. पण, याच उमेदवारी अर्जावरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य चव्हाट्यावर आला आले आहे. मुंबई महापालिकेचे सर्वाधिक 227 प्रभाग आहेत. तर उमेदवारीच्या मागणीसाठी इच्छूक उमेदवाराकडून मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात आल्याचं चित्र आता समोर आलं आहे. तसेच न्यायाची मागणी देखील करण्यात आली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोलापूर महानगरपालिका : ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्याच महिला नेत्याने प्रणिती शिंदेंना दगा दिला

मातोश्रीबाहेर रडारड 

'आम्हाला न्याय द्या', अशी मागणी नाराज असलेले ठाकरेंचे उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे. मातोश्रीबाहेरच त्यांनी हातात एक फोटो घेतलेला दिसून येत आहे. तसेच ते ठिय्या मांडून बसल्याचं दिसत आहेत. तेव्हा त्यांनी आपले हात जोडून उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

ठाकरेंच्या इच्छूकांकडून तिकीटांची मागणी 

'2017 मध्ये ओबीसी वॉर्डातून दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं होतं. पण निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा आम्हाला तिकीटं द्यावी, अशी मागणी होताना दिसते, असं उमेदवारांनी आपल्या मनातील सल व्यक्त केलीये.

हे ही वाचा : मातोश्रीवर खडाजंगी, अनिल परब बैठकीतून निघून गेले, वरुण सरदेसाईंसोबत मोठा वाद; नेमकं काय घडलं?

निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. लोकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो. लोकांचा आमच्यावर दृढ विश्वास आहे आणि ते आम्हाला निवडून देतील, असा विश्वास ठेवण्यात आला आहे, असं म्हणत त्यांनी उमेदावारीची मागणी केली होती.

    follow whatsapp