बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह! 4 दिवसांनंतर पाहिलं अन्...

4 दिवसांपासून बंद असलेल्या एका दुकानातील फ्रीजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. एका व्हेज बिर्याणी दुकानात ही भयानक घटना घडली. हे दुकान गेल्या 4 दिवसांपासून बंद होतं आणि रविवारी मालकाने दुकान उघडल्यानंतर भयंकर दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह!

दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह!

मुंबई तक

01 Mar 2026 (अपडेटेड: 01 Mar 2026, 03:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बिरयानीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह!

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपासून बंद असलेल्या एका दुकानातील फ्रीजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. जीसीआरजी कॉलेज गेटजवळील एका व्हेज बिर्याणी दुकानात ही भयानक घटना घडली. हे दुकान गेल्या 4 दिवसांपासून बंद होतं आणि रविवारी मालकाने दुकान उघडल्यानंतर भयंकर दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

हे वाचलं का?

विजय पाल (38) अशी मृत तरुणाची ओळख समोर आली असून तो बीकेटीच्या किशुनपूर गावातील रहिवासी होता. वृत्तानुसार, दुकानाचा मालक 4 दिवसांनंतर परतला आणि त्याला फ्रीजमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यावेळी, तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. 

फ्रीजमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह... 

प्रकरणाची माहिती पोलीस त्वरीत घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात बरेच महत्त्वाचे पुरावे समोर आले. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की हे एक तात्पुरतं म्हणजेच टेम्पररी दुकान होतं आणि आत फ्रीजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. त्या फ्रीजचं वीज कनेक्शन देखील कापण्यात आलं होतं. मृत तरुणाच्या खिशातून एक मोबाईल फोन आणि आधार कार्ड सापडलं असून त्याआधारे मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली. मृतदेहावर कोणत्याही गंभीर दुखापतीच्या खुणा नव्हत्या. 

हे ही वाचा: क्रिकेटपटू शोएब मलिक आता चौथं लग्न करणार? सानिया मिर्झाबाबतही मोठं वक्तव्य...

पोलीस आता सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. दुकानाच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जात असून मृत विजय पाल तिथे कसा पोहोचला? आणि दुकान शेवटचं कधी खुलं होतं? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. 

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, व्हेज बिर्याणी शॉपच्या फ्रीजमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला असून घटनेची माहिती मिळताच तपास सुरू करण्यात आला. तसेच, मृतदेहाचा पंचायतनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतर तरुणाच्या मृत्यूमागच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जाईल. 

    follow whatsapp