क्रिकेटपटू शोएब मलिक आता चौथं लग्न करणार? सानिया मिर्झाबाबतही मोठं वक्तव्य...
गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडियावर शोएब मलिक चौथं लग्न करणार असल्याचा दावा केला जात होता. चौथ्या लग्नाबाबतच्या या चर्चांवर शोएब मलिक याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
क्रिकेटपटू शोएब मलिक आता चौथं लग्न करणार?
सानिया मिर्झाबाबतही मोठं वक्तव्य...
Shoaib Malik Fouth marriage: माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आता त्याच्या वैवाहिक आयुष्य आणि लव्ह लाइफमुळे पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडियावर शोएब मलिक चौथं लग्न करणार असल्याचा दावा केला जात होता. चौथ्या लग्नाबाबतच्या या चर्चांवर शोएब मलिक याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शोएब मलिकची प्रतिक्रिया...
शोएब मलिकने त्याच्या चौथ्या लग्नाचा दावा करणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, त्याने त्याची पत्नी सना जावेदला टार्गेट करणाऱ्या ट्रोलर्सनाही चोख प्रत्युत्तर दिलं. त्याने सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटावरही भाष्य केलं. शोएब मलिक म्हणाला की, 2023 च्या सुरुवातीलाच माझं लग्न मोडलं. आम्ही दोघांनी मिळून आमच्या मुलाला एकत्र वाढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांत घेण्यात आला. त्यानंतरच मी पुन्हा लग्न केलं. माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी मी नेहमीच माझं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, माझे मौन कदाचित कमकुवतपणा समजला गेला असेल.
शोएब मलिकने पुढे म्हटलं की त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या खोट्या बातम्या त्याच्या परवानगीशिवाय पसरवल्या केल्या जात आहेत. त्याने असंही म्हटलं की काही लोकांनी त्याचं नाव अशा महिलांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांना तो कधीही भेटला नाही. सना जावेदशी लग्न केल्यापासून त्याची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं त्यांचं मत आहे.
हे ही वाचा: पाकिस्तान पेटला! कराचीतील अमेरिकेन दूतावास जाळलं, इराणवरील हल्ल्यानंतर मोठी निदर्शने
तसेच पुढे तो म्हणाला की, "मला वाटतंय हे सगळं आता इतकं हाताबाहेर गेलं आहे की आता बोलणं गरजेचं झालं आहे. माझा मुलगा आता अशा वयात आला आहे जिथे तो या खोट्या आणि बनावट कथा वाचेल, ज्या फक्त काही पैशांसाठी आणि व्ह्यूजसाठी पसरवल्या जात आहेत. शोएब मलिकने लोकांना त्याच्या गोपनीयतेचा आदर करावा अन्यथा तो द्वेष करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करेल असा इशारा दिला. "जबाबदार राहा, काही लाईक्स आणि व्ह्यूजपेक्षा आयुष्यात बरेच काही असते." असं त्यांने लिहिलं.










