हतबल दीर धाय मोकलून रडला, डोळ्यासमोरच मित्रांनी वहिनीवर केला सामुहिक बलात्कार, कानाला बंदुक लावून...

Crime News Uttarakhand : निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी आपले खरे रूप दाखवले. आरोपींनी दिराच्या कानाला पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हतबल दीर आपल्या वहिनीला सोडण्यासाठी नराधमांकडे गयावया करत होता, मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने तिच्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केले.

Crime News Uttarakhand

Crime News Uttarakhand

मुंबई तक

01 Mar 2026 (अपडेटेड: 01 Mar 2026, 04:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हतबल दीर धाय मोकलून रडला

point

डोळ्यासमोरच मित्रांनी वहिनीवर केला सामुहिक बलात्कार

point

कानाला बंदुक लावून...

Crime News Uttarakhand ,रुद्रपूर (उत्तराखंड):  उत्तराखंडमधील उधमसिंग नगर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रुद्रपूर येथे एका महिलेवर तिच्या दिरासमोरच त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी पीडितेच्या दिराच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला शांत बसण्यास भाग पाडले आणि महिलेवर अत्याचार केले.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडित महिलेला शहरातील गांधी पार्क येथे सुरू असलेला 'सरस मेळा' पाहण्याची इच्छा होती. पतीने कामामुळे जाण्यास नकार दिल्यानंतर, महिला तिच्या दिरासोबत मेळावा पाहण्यासाठी गेली होती. मेळाव्यामध्ये दिराचे दोन मित्र, राजा (रा. खेडा) आणि करण (रा. भदईपुरा) यांची भेट झाली. सर्वांनी मिळून तिथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि गायक पवनदीप राजन यांचा कार्यक्रमही पाहिला. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान घरी परतत असताना, दोन्ही आरोपींनी 'शॉर्टकट' रस्त्याने नेण्याचे आमिष दाखवून त्यांना किच्छा बायपासजवळील 'ब्युटीफुल कंपनी'च्या एका निर्जन भागात नेले.

हेही वाचा : बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह! 4 दिवसांनंतर पाहिलं अन्...

दिरासमोरच केला अत्याचार 

निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी आपले खरे रूप दाखवले. आरोपींनी दिराच्या कानाला पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हतबल दीर आपल्या वहिनीला सोडण्यासाठी नराधमांकडे गयावया करत होता, मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने तिच्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर राजा आणि करण या दोघांनी आळीपाळीने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, नराधमांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसात गेल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पोलीस तपासात नवीन वळण

याप्रकरणी पीडितेने हिंमत दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

"प्राथमिक तपासानुसार या घटनेत दिराची भूमिका संशयास्पद वाटत आहे. आरोपी हे त्याचेच मित्र असल्याने आणि ज्या पद्धतीने घटना घडली, त्यावरून दिराचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का, याचा आम्ही कसून तपास करत आहोत," असे पोलिसांनी सांगितले.

परिसरात संतापाची लाट

भरवस्तीतील मेळाव्यातून परतताना एका महिलेसोबत घडलेल्या या घटनेमुळे रुद्रपूर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

    follow whatsapp