पोलीस सब-इन्स्पेक्टर सुनेने सासूच्या डोक्यात खलबत्ता घातला, किरकोळ वाद टोकाला पोहोचला अन् भयंकर घडलं

सासू-सुनेच्या वादातून धक्कादायक घटना घडल्याचं समोर येत असतं. अशीच एक भयानक बातमी समोर आली असून एका महिलेने आपल्या 50 वर्षीय सासुच्या डोक्यात खलबत्त्याने वार केल्याची माहिती आहे. नेमकं कारण काय? सविस्तर जाणून घ्या.

सब-इन्स्पेक्टर सुनेने सासूच्या डोक्यात खलबत्ता घातला

सब-इन्स्पेक्टर सुनेने सासूच्या डोक्यात खलबत्ता घातला

मुंबई तक

• 04:43 PM • 01 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलीस सब-इन्स्पेक्टर सुनेने सासूच्या डोक्यात खलबत्ता घातला

point

किरकोळ वाद टोकाला पोहोचला अन् भयंकर घडलं

Crime News: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात सासू आणि सुनेच्या वादातून धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, एका महिलेने आपल्या 50 वर्षीय सासुच्या डोक्यात खलबत्ता घालून तिला गंभीररित्या जखमी केल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी तपासणी करून पुरावे गोळा केले. 

हे वाचलं का?

महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात घेताच तिला उपचारांसाठी भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात रेफर करण्यात आलं. एफएसएल टीमने जखमी महिलेच्या निवासस्थानी पोहोचून मारहाणीत वापरलेला खलबत्ता आणि चाचणीसाठी रक्ताचा नमुना ताब्यात घेतला. जखमी महिलेचं नाव किरण देवी असून तिच्या जबाबाच्या आधारे पोलीस कर्मचारी असलेली सून नूतन कुमारीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेवर कारवाई करत पोलिसांनी तिला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, किरण देवीचा मुलगा ऋतुराज यांचं नूतन कुमारीसोबत दोन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र, लग्नानंतर दोन्ही पक्षांमधील नातेसंबंधात तणाव निर्माण झाला. वृत्तानुसार, ऋतुराज हे दिल्ली पोलिसात सब-इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असून नूतन कुमारी सुद्धा पोलीस सब-इन्स्पेक्टर असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

या घटनेबाबत पीडित किरण देवी म्हणाल्या की, नूतन कुमारी ही माझी धाकटी सून आहे. ती मला वारंवार जीवे मारण्याची धमकी देते. माझ्या मुलाने आणि सुनेने प्रेमसंबंधातून लग्न केलं होतं आणि वादानंतर सुनेने मला मारण्याचा प्रयत्न केला. ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत आली आणि दगडाच्या खलबत्त्याने डोक्यात वार केला. लग्न झाल्यापासूनच ती मला टार्गेट करत आहे. ती वारंवार मला व्हॉट्सअॅपवर मॅसेज करून त्रास द्यायची. म्हणूनच मी तिला ब्लॉक केलं. 

हे ही वाचा: बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह! 4 दिवसांनंतर पाहिलं अन्...

दरम्यान, जखमी महिलेचा मोठा मुलगा मनजीत कुमार याने सांगितलं की, त्याच्या भावाने 2024 मध्ये नूतनशी लव्ह मॅरेज केलं. लग्नानंतर ती त्याच्यासोबत दिल्लीत राहू लागली, परंतु काही दिवसांनी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. 2025 मध्ये सब-इन्स्पेक्टर नूतनने त्याच्या आईवर हल्ला केला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी महिला नूतन कुमारीला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp